महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रोहित पवारांचे अजितदादांना स्वगृही परतण्याचे आवाहन - महाविकास आघाडीचे सरकार

राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांनी परत स्वगृही परतावे म्हणून साद घातली आहे. फेसबुक पोस्टद्वारे त्यांनी अजित पवारांनी स्वगृही परतावे, असे आवाहन केले आहे. लवकरच महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येईल पण यात हक्काची माणसं दूरावू नयेत, अशी भीतीही व्यक्त केली आहे.

रोहित पवारांचे अजितदादांना स्वगृही परतण्याचे आवाहन

By

Published : Nov 24, 2019, 12:21 PM IST

मुंबई- अजित पवार यांनी बंड पुकारत भाजपशी हातमिळवणी केली आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षासोबतच आणि पवार कुटुंबातही उभी पडल्याचे चित्र आहे. अशावेळी राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांनी परत स्वगृही परतावे म्हणून साद घातली आहे. फेसबुक पोस्टद्वारे त्यांनी अजित पवारांनी स्वगृही परतावे, असे आवाहन केले आहे. तसेच लवकरच महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येईल पण यात हक्काची माणसं दूरावू नयेत, अशी भीतीही व्यक्त केली आहे.

रोहित पवार यांची फेसबुक पोस्ट -

'लहानपणापासून साहेबांना पाहत आलो, प्रश्न राजकीय असो की कौंटुबिक साहेब कधी खचून जात नाहीत. माझे आजोबा अप्पासाहेब पवार गेल्यानंतर वडील राजेंद्रदादांना धीर देणारे साहेब मी पाहिले आहेत आणि अजितदादांचे वडील अनंतराव पवार गेल्यानंतर अजितदादांना सावरणारे देखील साहेबच होते.

अजितदादांच्या वडिलांच्या पश्चात दादांच्या लहानपणापासून त्यांना वडिलांचे प्रेम देणारे साहेबच होते. तसेच आदरणीय पवार साहेबांवर अडचण आल्यानंतर खंबीर भूमीका घेणारे अजितदादा देखील आपण पाहिले आहेत. प्रश्न कौटुंबिक असो की राजकिय खचून जाणं हे साहेबांच्या डिक्शनरीत नाही.

आजच्या घडामोडी पाहताना जूनं चित्र कायम तसेच असावे. अजितदादांनी साहेबांचे निर्णय मान्य करावेत व स्वगृही परत यावे, असे मनापासून वाटते. साहेब राजकारण आणि कुटुंब कधीच एकत्र करत नाहीत व ते करणार देखील नाहीत, पण कुठेतरी सर्वसामान्य घरातून एक व्यक्ती 'पवार साहेब' होतो. सर्वसामान्यांच्या आवाज होतो व अखेरपर्यंत लढत राहतो तेव्हा या देशातल्या अहंकारी शक्ती तो आवाज दाबू पहात आहेत, अशा वेळी कुटूंबाचा एक घटक म्हणून व्यक्तिशः मला असे वाटतं की, आपण सर्वांनी साहेबांच्या सोबत राहायला हवे. लवकरच महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येईल पण यात हक्काची माणसं दूरावू नयेत, असे व्यक्तिश: वाटते, अशी फेसबुक पोस्ट रोहित पवार यांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details