मुंबई - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा हा दौरा अत्यंत महत्वाचा आहे. देशातील आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी भारताला अमेरिकेसह इतर राष्ट्रांचा पाठिंबा गरजेचा आहे, अशी प्रतिक्रिया आज विधीमंडळाबाहेर आमदार रोहित पवार यांनी दिली.
नमस्ते ट्रम्प! 'हा दौरा भारतासाठी अत्यंत महत्वाचा; रोहित पवारांची प्रतिक्रिया - डोनाल्ड ट्रम्प
ट्रम्प देशाच्या आर्थिक राजधानीत आले असते तर त्याचा महाराष्ट्राला फायदा झाला असता, असे आमदार रोहित पवार म्हणाले. या दौऱ्याच्या माध्यमातून अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांची व्हिसाची समस्या सोडवली जाईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
हेही वाचा -LIVE: 'नमस्ते ट्रम्प'! अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि मोदी यांचा रोड शो सुरू...
ट्रम्प देशाच्या आर्थिक राजधानीत आले असते तर त्याचा महाराष्ट्राला फायदा झाला असता, असेही ते म्हणाले. या दौऱ्याच्या माध्यमातून अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांची व्हिसाची समस्या सोडवली जाईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 'सरकार पाडण्याची मर्यादा मी ११ दिवसांनी वाढवली' या नारायण राणेंच्या वक्तव्यावरही त्यांनी भाष्य केले. 'नारायण राणेंच्या वक्तव्याकडे किती लक्ष द्यायचे, हे ज्याचे त्याने ठरवावे' असा खोचक टोला त्यांनी लगावला.