मुंबई -पवई हिरानंदानीमधील लेक फ्रंट सोलँटर या गगनचुंबी इमारतीमध्ये चोरट्याने सोने आणि पैश्यांसहीत एकून ९ लाख २५ हजारावर हात साफ केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार, रविवीरी रात्री १ वाजेच्या सुमारास चोरटे पवई हिरानंदानीतील २९ मजली असणाऱ्या लेक फ्रंट सोलँटर नामक इमारतीच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर चोरीच्या उद्देशाने शिरले. त्यानंतर घरफोडी करून मोल्यवान ऐवज लुटला.
पाचव्या मजल्यावर चोरट्यांचा प्रवेश; पवई हिरानंदानीतील इमारतीमध्ये ९ लाखांची चोरी
हिरानंदानीतील सोलँटर ही इमारत २९ मजली असून ही इमारत काचेच्या स्वरूपात दिसणारी गगनचुंबी इमारत आहे. त्यामुळे इमारतीला लोखंडी ग्रील लावणे बंधनकारक नसून त्याचा फायदा घेत चोर इमारतीत घुसले असल्याचे पवई पोलिसांनी सांगितले.
सीसीटीव्हीचा पहारा असताना देखील चोरट्यांनी इमारतीच्या बाहेरील बाजूने आत प्रवेश केला. तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावरील रूममध्ये या चोरट्यांनी डल्ला मारायचा प्रयत्न केला. मात्र, चोरट्यांना दोन रूममध्ये काहीच मिळाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. पाचव्या मजल्यावरील हरोष जॉन कठ्ठूकरन हे आपल्या कुटुंबासहीत गाढ निद्रेत असताना त्यांच्या किचनमधून चोरट्यांनी घुसखोरी करत २५ हजार रोकड आणि सोने, असा एकूण ९ लाख २५ हजारांचा ऐवज लंपास केला आहे.
हिरानंदानीतील सोलँटर ही इमारत २९ मजली असून ही इमारत काचेच्या स्वरूपात दिसणारी गगनचुंबी इमारत आहे. त्यामुळे इमारतीला लोखंडी ग्रील लावणे बंधनकारक नसून त्याचा फायदा घेत चोर इमारतीत घुसले असल्याचे पवई पोलिसांनी सांगितले. आम्ही इमारतीतील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून आरोपींना लवकरात लवकर अटक करू, असे पवई पोलिस ठाणे निरिक्षक विजय दळवी यांनी ‘ईटीव्ही भारत’शी बोलताना सांगितले.