महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईत स्वस्तात सोने विक्रीच्या बहाण्याखाली लुटणारी टोळी सक्रिय; दोघांना अटक

तक्रारदार व्यापाऱ्याला सोन्याची बिस्किटे 2 लाख 50 हजारांना विकण्याच्या बहाण्याखाली मुंबईतील बोरिवली परिसरात बोलविण्यात आले होते. व्यापाऱ्याला आरोपींनी बोलण्यात गुंतवून ठेवले. त्याच्याकडून पैसे घेऊन पळ काढला.

स्वस्तात सोने विक्रीच्या बहाण्याखाली लुटणारी टोळी सक्रिय

By

Published : Nov 16, 2019, 5:36 PM IST

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून स्वस्तात सोन्याची बिस्किटे विकण्याच्या बहाण्याखाली लुटणाऱ्या टोळीचे प्रमाण वाढले आहे. मुंबई पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. 30 हजाराहून अधिक महाग असलेले 10 ग्राम सोन्याचे बिस्किट केवळ 20 हजारात विकायची आहेत, असे सांगत या टोळीने अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. मुंबई , ठाणे आणि नवी मुंबईच्या विविध भागात या टोळ्या सक्रिय आहेत.

स्वस्तात सोने विक्रीच्या बहाण्याखाली लुटणारी टोळी सक्रिय

हेही वाचा-पालघरमध्ये प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरच्या रॅगिंगप्रकणी १५ वरिष्ठ डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल

अशाच एका प्रकरणात पीडित तक्रारदार व्यापाऱ्याला सोन्याची बिस्किटे 2 लाख 50 हजारांना विकण्याच्या बहाण्याखाली मुंबईतील बोरिवली परिसरात बोलविण्यात आले होते. व्यापाऱ्याला आरोपींनी बोलण्यात गुंतवून ठेवले. त्याच्याकडून पैसे घेऊन पळ काढला. आपल्याला फसवल्याचे लक्षात आल्यावर पीडित व्यापाऱ्याने या संदर्भात गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी या संदर्भात तपास करीत आतापर्यंत 2 आरोपींना अटक केली आहे. या टोळीतील इतर आरोपींचा शोध सुरू आहे. अटक आरोपींकडून पोलिसांनी काही नकली सोन्याची बिस्किटे सुद्धा हस्तगत केली आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details