मुंबई :राज्यामध्ये खाजगी बस किंवा सरकारी बस यांचे अपघात होण्याचे प्रकरण कानावर येत असते. त्या संदर्भातल्या मोठ्या घडामोडी आणि मोठे अपघात झाल्यावर शासन तात्काळ लक्ष घालते. परंतु रस्ते अपघाताचे प्रमाण कमी होत नाही, यामुळेच एसटी महामंडळाने आता याबाबत कंबर कसलेली आहे. राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने दिलेल्या सूचनेनुसार राज्यामध्ये चालकांचे प्रबोधन (Road safety campaign) केले जाणार आहे. तसेच त्यांचे प्रशिक्षण कितपत आहे ? आरोग्य संदर्भातली त्यांची स्थिती काय आहे ? अशा अनेक बाबी यामध्ये तपासल्या जाणार आहेत.
एसटी महामंडळाची 25 जानेवारीपर्यंत रस्ता सुरक्षा मोहीम सुरू एसटी महामंडळाचे चालक सहभागी होणार :या संदर्भात प्रवाशांचे देखील प्रबोधन केले जाणार आहे. प्रवाशांनी कोणती काळजी घ्यावी, रस्ता पार करत असताना कोणते नियम आहेत, बसच्या संदर्भात चढ-उतार करत असताना कोणत्या गोष्टींचे पालन करायला हवे याबाबत देखील प्रवाशांना मार्गदर्शन दिले जाणार आहेत. यामध्ये एसटी महामंडळाचे कर्मचारी (Employees of ST Corporation) तसेच वाहतूक पोलीस यांची मदत घेतली जाईल. एसटी महामंडळाचे चालक यामध्ये सहभागी होणार आहेत. राज्यातील एसटी महामंडळाचे 24,389 चालक सध्या कार्यरत आहेत. हे सर्व चालक या मोहिमेमध्ये सहभागी होतील.
जागरूकता निर्माण करणे महत्वाचे : बसच्या चालकांच्या संदर्भात त्यांची आरोग्य तपासणी केली जाईल. त्यांचे प्रशिक्षण व्यवस्थित आहे किंवा नाही, हे पाहिले जाईल. बसची सद्यस्थिती काय आहे, बसचा वाहनाचा परवाना आहे किंवा नाही, बसमध्ये काही तांत्रिक काम अपूर्ण आहे किंवा नाही, बसेसची तांत्रिक दुरुस्ती त्याचा सुधार अशा अनेक बाबींवर एसटी एसटी महामंडळाच्या वतीने भर दिला जाणार आहे. तांत्रिक दुरुस्ती करण्याचे कारण असे की, जर बस नादुरुस्त असेल किंवा तांत्रिक बिघाड असेल त्या बसमध्ये सुधारणा करून मगच चालवायला घेणे अन्यथा अशा तांत्रिक बिघाड झालेल्या बस पुढे धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे त्याबाबत ही जागरूकता निर्माण करणे महत्वाचे आहे.
एसटी महामंडळाचा उद्देश : एसटी महामंडळाने सांगितले की, जेव्हा चालकांना सुरक्षित प्रवासाचे महत्त्व पटवून दिले. तेव्हा त्यांचे मानसिक संतुलन मजबूत झाले. याचा परिणाम म्हणूनच गेल्या काही वर्षात प्रवासी वाहनांच्या तुलनेत एसटीच्या अपघातांची संख्या कमी आहे. या संदर्भात महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाचे आयुक्त यांनी ई टीवी भारत सोबत संवाद साधताना सांगितले की, 'रस्ते सुरक्षा, प्रवासी सुरक्षा, वाहक आणि चालक यांची सुरक्षितता महत्वाची आहे. म्हणून ही मोहीम एस टी महामंडळाच्या वतीने सुरू करत आहोत. प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी तसेच वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे महत्वाचे आहे. उत्तम शरीर आणि प्रकृती जर असेल तर मनस्वास्थ्य राहील आणि या सूत्रांचे पालन केले, तर जनतेला अपघाताशिवाय सेवा देता येईल हा एसटी महामंडळाचा (ST Corporation) उद्देश आहे.