मुंबई -गेल्या तीन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे मुंबईत पाणी साचण्यासह भींती आणि इमारत कोसळण्याच्या घटना ही वाढत आहेत. दोन दिवसापूर्वी मालाड येथील घरे कोसळून मोठी जीवितहानी झाली होती. ही घटना घटना ताजी असतानाच पवईतील रहेजा विहार येथील मनपाच्या प्रशिक्षण केंद्र असणाऱ्या ठिकाणी आणि हाय प्रोफाईल खासगी इमारतीची संरक्षण भींत आणि आसपासच्या जमीन पावसामुळे भुस्खलन झाले आहे.
5 वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान -
तब्बल 150 मीटर पर्यंत ही जमीन खचली असून या इमारतीच्या कडेलगत पार्क केलेल्या 5 वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मनपा आणि अग्निशमन दलाकडून मलबा उचलण्याचे काम सुरू असून सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. या ठिकाणी कोविड सेंटरदेखील आहे. हे सेटर बंद अवस्थेत आहे. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे. पवईतील अनेक ठिकाणी अश्या प्रकारे भुस्खलन दरवर्षी होत असते. मात्र, प्रशासनाने याकडे लक्ष दिले पाहिजे, अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे.
हेही वाचा - कुलभूषण जाधव यांना दिलासा; नवीन कायद्यानुसार पाकिस्तानी उच्च न्यायालयात मागता येणार दाद