मुंबई - सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) चौकशी केली जात आहे. शुक्रवारी सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती ही ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाली होती. या चौकशी दरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांनी सुशांतच्या कंपनीच्या आर्थिक व्यवहारांशी संबंधित रियाला माहिती विचारली. तिने याबाबत ईडी अधिकाऱ्यांना आपण कुठल्याही प्रकारचे आर्थिक लाभ करवून घेतले नसल्याचे म्हटले आहे.
रिया म्हणाली, सुशांतच्या केवळ दोनच गोष्टी माझ्याकडे... - सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण
चौकशीत रियाने सुशांतच्या केवळ दोनच गोष्टी आपल्याकडे असल्याचे म्हटले आहे.
या बरोबरच रियाने सुशांतच्या केवळ दोनच गोष्टी आपल्याकडे असल्याचे म्हटले आहे. यात सुशांतने एका वहीच्या पानावर काही लोकांचे मानलेले आभार आणि सुशांतच्या छिछोरे या चित्रपटाचे नाव असलेली पाण्याची बाटली यांचा समावेश असल्याचे तिने म्हटले आहे.
सुशांतसिंहने त्याच्या जवळच्या एका वहीत क्रमांकानुसार त्याच्या कुटुंबातील व्यक्ती, रियाबद्दल लिहिले होते. यात त्याने म्हटले आहे की, मी माझ्या आयुष्यासाठी कृतज्ञ आहे. माझ्या आयुष्यातील लिल्लूसाठी (शोविक चक्रवर्ती) मी कृतज्ञ आहे. माझ्या आयुष्यातील बेबूसाठी (रिया चक्रवर्ती) मी कृतज्ञ आहे. माझ्या आयुष्यातील सरांसाठी (केके सिंह, सुशांतचे वडील) मी कृतज्ञ आहे. माझ्या आयुष्यातील मॅडमसाठी (सुशांतची आई) मी कृतज्ञ आहे. माझ्या आयुष्यातील फजसाठी (सुशांतचा पाळीव कुत्रा) मी कृतज्ञ आहे. माझ्या आयुष्यातील सर्व प्रेमासाठी मी कृतज्ञ आहे.