मुंबई - सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात रिया चक्रवर्तीची सलग तिसऱ्या दिवशी एनसीबीकडून चौकशी केली जाणार आहे. या चौकशीला हजर होण्यासाठी रिया तिच्या घरातून निघाली आहे. आज या प्रकरणात काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अधिक माहिती देताना आमचे प्रतिनिधी अक्षय गायकवाड... सुशांत प्रकरणात काल (सोमवार) एक नवे वळण आले. रिया चक्रवर्तीने सोमवार रात्री सुशांत सिंहच्या बहिणी आणि एक डॉक्टर यांच्या विरोधात विविध कलमांतर्गत वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. सुशांत सिंहच्या बहिणी मितू आणि प्रियंका यांच्यासह दिल्ली येथील राम मनोहर लोहिया रुग्णालयाचे डॉक्टर तरुण कुमार यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
सोमवारी एनसीबीच्या चौकशी नंतर रिया घरी न जाता, थेट वांद्रे पोलीस ठाण्यात पोहोचली. तब्बल पाच तासानंतर मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास रिया एफआयआर करून घरी गेली. फसवणूक, सरकारी कागदपत्रांचा दुरुपयोग, कट रचणे, आत्महत्येस कारणीभूत असणे तसेच अंमलीपदार्थ विरोधी विविध कलमांतर्गत तिने हा गुन्हा नोंदविला आहे. मात्र या तक्रारीचा तपास सीबीआयकडून केला जाणार आहे. मुंबई पोलीस ही तक्रार सीबीआयकडे सोपवणार आहे.
हेही वाचा -सुशांत सिंह राजपूत प्रकरण : रियाच्या तक्रारीनंतर सुशांतची बहिण प्रियंका विरोधात वांद्रे पोलीस स्थानकात गुन्हा दाखल
हेही वाचा -सुशांतसिंह प्रकरण : ..म्हणून सुशांतच्या बहिणीच्या विरोधात गुन्हा दाखल करा - रिया चक्रवर्ती