मुंबई - अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्जबाबत तपास करत असलेल्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) आज (रविवारी) सकाळी सुशांतची प्रेमिका रिया चक्रवर्ती हिला समन्स बजावले होते. त्यानुसार चौकशीसाठी रिया चक्रवर्ती आज एनसीबी कार्यालयात हजर झाली होती. तिची दिवसभर चौकशी सुरू होती. मात्र, तिला आज अटक झाली नाही. उद्या (सोमवारी) पुन्हा तपासासाठी एनसीबी कार्यालयात बोलवण्यात येणार आहे. रिया चक्रवर्तीला आज अटक होणार नाही. उद्या तिला पुन्हा चौकशीसाठी बोलावले आहे, असे एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी माध्यमांना सांगितले.
सुशांतसिंह प्रकरण : रिया चक्रवर्तीला अटक नाही; एनसीबी उद्या पुन्हा करणार चौकशी - riya chakraborty ncb enquiry
आज (रविवारी) दिवसभर रिया चक्रवर्तीची विविध विषयांवर प्रश्नउत्तरे करून चौकशी करण्यात आली. आज न्यायालय सायंकाळी बंद झाले, असल्याने तिला अटक करण्यात आली नाही. मात्र, उद्या तिची अजून सखोल चौकशी करून, न्यायालयात हजर करुन तिच्या कोठडीची मागणी एनसीबी अधिकारी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे.
दरम्यान, आज (रविवारी) दिवसभर रिया चक्रवर्तीची विविध विषयांवर प्रश्नउत्तरे करून चौकशी करण्यात आली. आज न्यायालय सायंकाळी बंद झाले, असल्याने तिला अटक करण्यात आली नाही . मात्र, उद्या तिची अजून सखोल चौकशी करून, न्यायालयात हजर करुन तिच्या कस्टडीची मागणी एनसीबी अधिकारी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे.
तसेच एनसीबीने अटक केलेल्या शोविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा तसेच दीपक सावंत आणि इतर दोघांची चौकशी सुरुच राहणार आहे. आज सर्वांना एकत्र बसवून त्यांची चौकशी करण्यात आल्याचे माहिती मिळत आहे. उद्या देखील या सर्वांना अधिकारी विविध माहिती घेत हे दोषी आहेत का? याची चौकशी करणार आहेत.