मुंबईRiya Chakraborty Case:सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात बॉलीवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिला ड्रग्ज बाळगल्या प्रकरणांमध्ये एनसीबीकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. (CBI) नंतर सीबीआयकडे तपास करण्यासाठी वर्ग केला गेला. त्यामुळे तिला परदेशात जाण्यासाठी सीबीआयच्या लूक आउट नोटीसचा अडथळा होता; परंतु तात्पुरता उच्च न्यायालयाने दिलासा दिला होता. याबाबत आज न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे खंडपीठांसमोर खटल्याची सुनावणी झाली असता उच्च न्यायालयाकडून आता ती स्थगिती पुन्हा 30 जानेवारीपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय झालेला आहे. (Sushant Singh Case) तसेच सीबीआयला उच्च न्यायालयाने विचारले तीन वर्षांत आपण या खटल्याचे काय केले. 30 जानेवारी 2024 रोजी या खटल्याची पुनः सुनावणी निश्चित केलेली आहे. पाच जानेवारी रोजी न्यायालयाने उच्च न्यायालयाने हे निर्देश दिले.
न्यायालयाचा खडा सवाल:बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणानंतर ड्रग्ज स्वतःकडे बाळगले. या घटनेत रिया चक्रवर्ती हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. एनसीबी कडून हा गुन्हा पटना येथे दाखल झालेला आहे. मात्र, तपास संस्था सीबीआयच्या नोटीसमुळे तिला परदेशात जाण्यास स्थगिती देण्यात आली होती. लूक आऊट नोटीसद्वारे तिच्या परदेशवारी करिता स्थगिती दिली गेली होती. मात्र ही स्थगिती तात्पुरत्या स्वरूपाची 27 डिसेंम्बर ते 2 जानेवारी 2024 पर्यंत उच्च न्यायालयाने मागच्या आठवड्यात उठवली होती. लूक आउट नोटीसची स्थगिती 30 जानेवारीपर्यंत उच्च न्यायालयाच्या आजच्या निर्देशामुळे कायम आहे. त्यामुळे केव्हाही देशाबाहेर जायचं असेल तर रिया चक्रवर्ती हिला उच्च न्यायालयाच्या परवानगीशिवाय ते शक्य नाही; परंतु या खटल्याच्या दरम्यान न्यायालयाने सीबीआयला कडक शब्दात विचारणा केली की, "तीन वर्षे आपण या प्रकरणात काय केले?"
सीबीआयचे काय आहे म्हणणे?सीबीआय कडून वकिलांनी बाजू मांडली की, रिया हिला दिलासा देऊ नये. त्याचं कारण गुन्हा पटना या ठिकाणी घडलेला आहे. एनसीबीने तो गुन्हा नोंदलेला आहे. सीबीआय तपास करीत आहे. त्यामुळे तपासाच्या संदर्भात पुन्हा तिच्याकडून कायम सहकार्य मिळायला हवे. म्हणूनच देश सोडून जाण्याच्या बाबत लूक आऊट नोटीसला उच्च न्यायालयाने जी तात्पुरता स्थगिती उठवली होती, ती पुढे आता कायम करावी.