महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबई महापौर पदासाठी काँग्रेसकडून नेते नव्हे अभिनेत्यांचा विचार? रितेश देशमुख, सोनू सूद, मिलिंद सोमण...

काँग्रेसच्या स्ट्रॅटजी कमिटी सचिव गणेश यादव यांनी मुंबईच्या महापौर पदी रितेश देशमुख, सोनू सूद, मिलिंद सोमण यांच्या नावांचा विचार करावा, असा अहवाल कमिटीला दिला आहे.

mumbai
mumbai

By

Published : Aug 24, 2021, 11:19 AM IST

मुंबई -मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी वेळोवेळी काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे. मात्र मुंबईच्या महापौरपदी अभिनेता रितेश देशमुख, सोनू सूद किंवा मिलिंद सोमण यांच्या नावाचा विचार करण्यात यावा, असा सल्ला काँग्रेसचे स्ट्रेटजी कमिटी सचिव गणेश यादव यांनी आपल्या अहवालातून दिला आहे.

काँग्रेसला उभारी देण्यासाठी अभिनेत्यांची गरज?

या स्ट्रॅटेजी कमिटीत एच.के पाटील, अशोक चव्हाण, नाना पटोले, भाई जगताप, अस्लम शेख, वर्षा गायकवाड, चंद्रकांत हंडोरे, विरोधी पक्ष नेते रवी राजा हे सर्व नेते आहेत. होऊ घातलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसकडून अभिनेत्यांच्या नावांचा विचार केला जावा, असा अहवाल समोर आला आहे. यानंतर सगळीकडे या अहवालाबाबत सध्या चर्चा सुरू आहे. त्यामुळे काँग्रेसला उभारी देण्यासाठी नेत्यांची नाही तर अभिनेत्यांची गरज आहे का? असा सवालही उपस्थित केला जात आहे.

काय म्हटलंय अहवालात?

गणेश यादव यांनी आपल्या अहवालामध्ये काँग्रेसची मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत होणारी मतांची घसरण याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. ही घसरण थांबवायची असेल तर, तरुणांशी आणि सामान्य लोकांशी थेट संपर्क असलेल्या व्यक्तींना महापौर पदाचे उमेदवार म्हणून काँग्रेसने समोर आणले पाहिजे. याचा फायदा येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेसला होईल, असं या अहवालात सांगण्यात आलं आहे. त्यामुळे हा अहवाल स्ट्रॅटजी कमिटीसमोर ठेवल्यानंतर काँग्रेस पक्षातील इतर नेते काय निर्णय घेणार? याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.

हेही वाचा -Video : 'मी असतो तर कानाखालीच मारली असती', उद्धव ठाकरेंबद्दल नारायण राणेंची जीभ घसरली

हेही वाचा -उद्धव ठाकरेंवर खालच्या थराची टीका, नारायण राणेंविरोधात महाडमध्येही गुन्हा दाखल

हेही वाचा -'नारायण राणे "कोंबडी चोर"', मुख्यमंत्र्यांवरील टीकेनंतर शिवसैनिक संतप्त

ABOUT THE AUTHOR

...view details