मुंबई : गोवंडी येथील झोपडपट्टीमध्ये मिसेल रूबेला ( Mycelial rubella disease ) या आजाराचे 15 संशयित रुग्ण आढळून आले ( Suspect patients were found ) आहेत. या विभागात 3 संशयितांचा मृत्यू झाल्याने पालिका प्रशासन कार्यरत झाले. या विभागांमध्ये लहान मुले आणि प्रौढ लोकांची स्क्रिनिंग करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या विभागामध्ये विटामिन ए च्या गोळ्या औषधे देण्याचे तसेच इम्युलायझेशन मोहीम सुरू ( emulation campaign begins ) करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात ( health department launched an operation ) आली आहे.
15 रुग्ण आढळून आले :मुंबई पालिकेच्या आरोग्य विभागाकडून एम ईस्ट विभागात म्हणजेच गोवंडी परिसरामध्ये झोपडपट्टी विभाग आहे. येथे सुमारे 3 हजार झोपड्या असून 12564 नागरिक येथे राहतात. त्यामधील 915 घरांमध्ये 4086 नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यात ताप, खोकला, सर्दी आणि अंगावर लालसर डाग असलेले 15 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामधील 4 ते 6 वयोगटातील 5 लहान मुले आहेत. यापैकी 6 नमुने पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी यांच्याकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. मोठ्या व्यक्तींकडून लहान मुलांमध्ये मिसेलचा प्रसार होण्याची भीती असल्याने मोठ्या व्यक्तींची स्क्रिनिंग केली जाणार आहे.