मुंबई :भारतीय संघाचा फलंदाज आणि यष्टीरक्षक ऋषभ पंत याला मुंबईत अंधेरी येथे असलेल्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल येथे पुढील उपचारासाठी काल सायंकाळी दाखल करण्यात आला आहे. काल सायंकाळी रिषभ पंत ( Cricketer Rishabh pan ) याला देहरादून वरून एअरलिफ्ट करून मुंबई पुढील उपचारासाठी आणण्यात आले. ( Rishabh Pant Health Condition ) गुडघा आणि पायावरील दुखापती वर पुढील उपचार होणार असून रिषभ पंत (Rishabh Pant) याच्यावर ऑर्थोपेडिक सर्जन दिनशॉ पारदिवाला यांच्या सेंटर ऑफ स्पोर्ट मेडिसिन टीम अंतर्गत देखरेखीखाली लवकरच लिंगामेट सर्जरी होणार आहे. (Rishabh Pant Health Updates)
ऋषभ पंतला जबर दुखापत : अद्याप ही सर्जरी कधी केली जाईल याबाबत अधिकृत माहिती हॉस्पिटल प्रशासन किंवा बीसीसीआय कडून देण्यात आलेली नाही. मात्र काल ऋषभ पंत याला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर काही प्राथमिक चाचण्या करण्यात आल्या. त्यानंतर लिगामेंट सर्जरी डॉक्टरांकडून केली जाणार आहे. 30 डिसेंबरला शुक्रवारी रात्री दिल्लीहून उत्तराखंड येथे असलेल्या आपल्या घरी जात असताना ऋषभ पंत याच्या गाडीचा अपघात झाला. यावेळी ऋषभ पंत स्वतः आपली गाडी चालवत होता. या अपघातात ऋषभ पंतला जबर दुखापत झाली. ऋषभ पंत याच्यावर आतापर्यंत देहरादूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.