महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Riots in Maharashtra: महाराष्ट्रातील वाढतोय सामाजिक तणाव.. धार्मिक अस्मितेमुळे की सरकारच्या राजकीय अपयशामुळे घडत आहे? - महाराष्ट्रातील वाढतोय सामाजिक तणाव

गेल्या काही दिवसात कोल्हापूरसह काही जिल्ह्यात धार्मिक कारणावरून हिंसाचार निर्माण झाला होता. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. हिंसाचारामुळे सरकारी आणि खासगी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत या दंगलीमागे धार्मिक कारणे आहेत की सरकारची कायदा व सुव्यवस्थेवरील पकड ढिली झाल्याने घडत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Riots in Maharashtra
Riots in Maharashtra

By

Published : Jun 14, 2023, 5:37 PM IST

मुंबई:दरवर्षीप्रमाणे 6 जून रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन सोहळा कोल्हापुरात धुमधडाका साजरा करण्यात आला. त्याच दिवशी, शहरातील तीन लोकांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर टिपू सुलतान आणि औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारे स्टेटस पोस्ट केले. त्यामुळे शहरात संतप्त वातावरण झाले.

हिंदुत्व संघटनांनी दुसऱ्या दिवशी बंद पुकारल्यानंतर आंदोलक व पोलिसांची झटापट झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कोल्हापुरातील इंटरनेट बंद करून संचारबंदी करण्यात आली. कोल्हापुरात वादग्रस्त सोशल मीडिया पोस्ट केल्यानंतर पुन्हा धुळे, अहमदनगर, बीड, जळगाव, नवी मुंबई या जिल्ह्यातही असेच प्रकार समोर आले आहेत.

विरोधकांचे आरोप-राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडण्याला सत्ताधारीच जबाबदार आहेत, असे आरोप विरोधी पक्षनेते नाना पटोले, शिंदे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहेत. दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापुरातील दंगलीबाबत बोलताना औरंगजेबाची औलाद अचानक कशी जन्माला आली, असे म्हटले. त्यांना शोधावे लागेल. त्यांचा सूत्रधार सापडेपर्यंत गप्प बसणार नाही, असा इशारा दिला होता. त्यावर एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी मग गोडसेचा मुलगा कोण आहे, हे फडणवीस यांनी उत्तर द्यावे, असे आव्हान दिले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सामाजिक सलोख्याचे वातावरण ठेवण्याची जबाबदारी सामान्यांची असल्याचे म्हटले. बिघडलेल्या वातावरणाचा सर्वाधिक फटका सामान्यांना होतो, याकडेदेखील लक्ष वेधले. त्याचबरोबर राज्यात शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करण्याची जबाबदारी राज्यकर्त्यांची असल्याचे सांगत आताची स्थिती हे चांगल्या राज्यकर्त्यांचे लक्षण नसल्याचे म्हटले.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अपयश :शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यातील दंगली म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अपयश असल्याचे म्हटले. 400 वर्षांपूर्वी दफन झालेल्या औरंगजेबाचा वापर करून राज्यात दंगली भडकवण्यासाठी भाजप प्रयत्न करत असल्याची घणाघाती टीका राऊत यांनी केले. कर्नाटकातही हा प्रयोग करण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला. देशात कुठेही दंगली झाल्या तर त्यासाठी भाजपच जबाबदार असते, असेही राऊत म्हणाले होते.

हेही वाचा-

  1. Maharashtra Riots : जाती-धर्माच्या नावावर महाराष्ट्रात दंगली...अखेर राज्यात चाललंय काय?

ABOUT THE AUTHOR

...view details