मुंबई : अल्पवयीन पीडित मुलीचा विनयभंग ( molestation of minor victim ) करणाऱ्या आरोपी रिक्षाचालकाला मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पोस्को न्यायालयाने तीन वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. पीडित मुलगी शाळेत सुटल्यानंतर घरी सोडण्याच्या निमित्ताने रिक्षात बसवून विनयभंग केला होता. या प्रकरणात बीकेसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. आरोपी जितेंद्रकुमार राजेंद्रप्रसाद सिंगला पोक्सो न्यायालयाचे विशेष न्यायाधीश अंनिस ए. जे. खान यांनी दोषी ठरविले आहे.
Minor Girl Molestation : अल्पवयीन तरुणीचा विनयभंग प्रकरण; रिक्षाचालकाला तीन वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा - रिक्षाचालकाला तीन वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा
अल्पवयीन पीडित तरुणीचा विनयभंग ( molestation of minor victim ) केल्याप्रकरणी रिक्षाचालकाला मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पोस्को न्यायालयाने तीन वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे.

घटना अशी आली समोर - वांद्रे-खेरवाडी येथील महापालिका शाळेच्या परिसरात 19 एप्रिल 2018 रोजी दुपारी ही घटना घडली होती. पीडित अल्पवयीन तरुणी शाळे सुटल्यानंतर घरी परतत असताना ऑटो रिक्षा चालकाने रिक्षात बसवून तरुणीचा विनयभंग केला होता. त्यानंतर सदर घटनेची माहिती पालकांना दिल्यानंतर ऑटो रिक्षा चालका विरोधात बीकेसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आरोपीचे विकृत कृत्य - शाळा सुटल्यानंतर मुलगी एकटीच गेटवर उभी होती. आरोपीने तिला घरी सोडतो असे सांगून रिक्षात बसवले. तिला पाणी आणि चिप्स खायला दिले. नंतर रिक्षातच तिचा विनयभंग केला होता. पीडित मुलीने सिग्नलजवळ रिक्षा थांबताच रिक्षातून उडी मारत सुरक्षारक्षकाची मदत मिळवली होती. याप्रकरणी मुलीच्या पित्याने तक्रार केल्यानंतर बीकेसी पोलिसांनी आरोपी जितेंद्रकुमार राजेंद्रप्रसाद सिंगला अटक केली होती.