महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रिया चक्रवर्ती जामिनासाठी सत्र न्यायालयात दाखल करणार याचिका - rhea chakraborty latest News

अमली पदार्थ विरोधी पथकाने(एनसीबी) मंगळवारी सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिला अटक करून न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. आज रिया चक्रवर्तीच्या वकिलांकडून सत्र न्यायालयमध्ये तिच्या जामिनासाठी याचिका दाखल करण्यात येणार आहे.

rhea chakraborty
रिया चक्रवर्ती

By

Published : Sep 9, 2020, 12:24 PM IST

मुंबई -अभिनेता सुशांतसिंह मृत्यू प्रकरणातील ड्रग्स सिंडिकेटचा तपास केला जात आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाने(एनसीबी) मंगळवारी सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिला अटक करून न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. आज रिया चक्रवर्तीच्या वकिलांकडून सत्र न्यायालयमध्ये तिच्या जामिनासाठी याचिका दाखल करण्यात येणार आहे.

रिया चक्रवर्ती जामिनासाठी सत्र न्यायालयात दाखल करणार याचिका

मंगळवारी रियाला एसीबीने अटक केली होती. एनसीबीकडून रिया चक्रवर्तीच्या रिमांडची मागणी करण्यात आली नव्हती. एनसीबीकडून न्यायालयात सांगण्यात आले होते की, तीन दिवसांच्या चौकशीदरम्यान रिया चक्रवर्तीकडून त्यांना योग्य प्रकारे सहकार्य मिळालेले आहे. त्यामुळे त्यांचा तपास आता योग्य दिशेने सुरू आहे. त्यानंतर न्यायालयाने रियाला 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले. एसीबीने दाखल केलेले गुन्ह्यांमध्ये एनडीपीएसच्या वेगवेगळ्या कलमांसह 27 (ए)हे कलम लावल्याने रिया चक्रवर्तीला दिवाणी न्यायालयमधून जामीन मिळू शकलेला नाही.

याअगोदर एनसीबीने रियाचा भाऊ शोविक, सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा आणि कुक दीपेश सावंत यांना अटक केली आहे. त्यांची एनसीबी कोठडी आज संपत असून त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्यापूर्वी त्यांना आरोग्य तपासणीसाठी रुग्णालयात दाखल केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details