मुंबई -सुशांतसिंह राजपुत मृत्यू प्रकरणात रिया चक्रवर्तीची चौकशी सुरू आहे. रियाला आज एनसीबीने (नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो) चौकशीसाठी बोलावले आहे. ती याविरोधात न्यायालयात जाईल, अशी सर्वत्र चर्चा होती. मात्र, रियाचे वकील सतीश मानेशिंदे यांनी रियाने जामिनासाठी कोणत्याही न्यायालयात धाव घेतलेली नाही, असे स्पष्ट केले आहे.
रियाने जामिनासाठी कोणत्याही न्यायालयात धाव घेतलेली नाही - अॅड. सतीश मानेशिंदे - रिया चक्रवर्ती लेटेस्ट न्यूज
रिया चक्रवर्ती चौकशीसाठी तयार आहे. कारण एखाद्यावर प्रेम करणे हा गुन्हा असेल तर, तिला हा प्रेमाचा गुन्हा मान्य आहे. रिया निर्दोष असल्याने तिने सीबीआय, ईडी आणि एनसीबी तसेच बिहार पोलिसांविरोधात कोणत्याही न्यायालयात धाव घेतलेली नाही, असे अॅड. मानेशिंदे यांनी सांगितले.
रिया चक्रवर्ती चौकशीसाठी तयार आहे. कारण एखाद्यावर प्रेम करणे हा गुन्हा असेल तर तिला हा प्रेमाचा गुन्हा मान्य आहे. रिया निर्दोष असल्याने तिने सीबीआय, ईडी आणि एनसीबी तसेच बिहार पोलिसांविरोधात कोणत्याही न्यायालयात धाव घेतलेली नाही, असे अॅड. मानेशिंदे यांनी सांगितले.
दरम्यान, अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूशी संबंधित असलेल्या अमलीपदार्थांच्या प्रकरणाच्या चौकशीसंदर्भात शनिवारी न्यायालयाने शोविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा यांना 9 सप्टेंबरपर्यंत नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या (एनसीबी) कोठडीत पाठवले आहे.