मुंबई - सुशांतसिंह मृत्यू प्रकरणाची सीबीआयकडून चौकशी केली जात आहे. या प्रकरणात रिया चक्रवर्तीचीही वारंवार चौकशी होत आहे. या दरम्यान, रियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर करत माध्यमांचा त्रास होत असल्याचे सांगितले आहे. माध्यमांच्या त्रासापासून वाचण्यासाठी तिने मुंबई पोलिसांकडे मदत मागितली आहे.
माध्यमांचा होतोय त्रास; रिया चक्रवर्तीने केली पोलीस संरक्षणाची मागणी - रिया चक्रवर्ती पोलीस संरक्षण मागणी
सुशांतसिंह मृत्यू प्रकरणात रिया चक्रवर्तीची वारंवार चौकशी होत आहे. या दरम्यान, रियाने तिच्या इंस्टाअग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर करत माध्यमांचा त्रास होत असल्याचे सांगितले आहे. माध्यमांच्या त्रासापासून वाचण्यासाठी तिने मुंबई पोलिसांकडे मदत मागितली आहे.
इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करताना रिया ने लिहिले आहे की, 'काही दिवसांपासून रिया व तिचे वडील ईडी व सीबीआयसारख्या तपास यंत्रणांकडे स्वतःचे म्हणणे मांडण्यासाठी घराबाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, काही निवडक प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधींकडून आमची अडवणूक केली जात आहे. कोरोनासारख्या महामारीत अशा प्रकारचे वर्तन कितपत योग्य आहे? यामुळे सोसायटीमध्ये राहणाऱया लहानमुलांच्या व जेष्ठांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे रियाने तिच्या इन्स्टाग्राम पोस्टवर लिहिले आहे. मुंबई पोलिसांनी याबद्दल दखल घेऊन पोलीस संरक्षण देण्याची मागणी रियाने केली आहे.
दरम्यान, रिया चक्रवर्ती हिचा भाऊ शोविक चक्रवर्ती हा आज सीबीआय पथकासमोर चौकशीसाठी डीआरडीओ गेस्ट हाऊस येथे हजर झाला. रियालाही सीबीआयकडून चौकाशीसाठी समन्स बजावण्यात आले आहे.