महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रिया व शोविकला 29 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी - रिया-शोविक जामीन याचिका सुनावणी

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो(एनसीबी)कडून अटक करण्यात आलेल्या रिया चक्रवर्ती आणि शोविक चक्रवर्ती या दोघांच्या जामीन याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली. मात्र, काही काळानंतर ती स्थगित करण्यात आली.

Rhea and Shovik
रिया व शोविक

By

Published : Sep 24, 2020, 7:14 PM IST

मुंबई -ड्रग्स प्रकरणी रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुन्हा एकदा तहकूब करण्यात आली. रिया आणि शौविकच्या जामीन अर्जावरील सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाने 29 सप्टेंबरपर्यंत तहकूब केली. त्यामुळे रिया आणि शौविक यांना तोपर्यंत तुरुंगात रहावे लागेल.

न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली आहे. या याचिकेवर बुधवारी(काल) सुनावणी होणार होती, परंतु मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे उच्च न्यायालयाची कारवाई स्थगित करण्यात आली, अशी माहिती रियाचे वकील सतीश मानेशिंदे यांनी दिली.

सुनावणीमध्ये रियाच्या वकिलांनी उपस्थित केलेले मुद्दे -

1) एनसीबीनुसार सुशांतच्या मृत्यू प्रकरणातील औषध क्रमांक १ 16/२० मधील ड्रग अँगलशी संबंधित आहे हे लक्षात घेऊन एनसीबीने केलेले तपास कोणतेही कार्यक्षेत्र आणि बेकायदेशीर आहेत, एससीआरने 1 ऑगस्ट रोजी दिलेल्या आदेशानुसार निर्देश दिले होते की सुशांतसिंग मृत्यूशी संबंधित सर्व प्रकरणे सीबीआयकडे वर्ग केली जातील. त्यामुळे ही चौकशी बेकायदेशीर असल्याचे आढळले आहे.

2) रियावर ज्या गुन्ह्यांकरिता कलमे लावलेली आहे ती जामीनपात्र आहेत आणि कलम 27A सध्याच्या प्रकरणात लागू होऊ शकत नाही.

3) एनडीपीएसच्या कलम 37नुसार जामिनावरील बंदी केवळ व्यावसायिक प्रमाणांवर लागू आहे आणि रियाच्या बाबतीत हे कलम लागू होत नाहीत.

4) रियाकडून काहीही जप्त केलेले नाही.

5) ही फक्त सूड बुद्धी आहे.

अ‌ॅडिशनल सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी जबाब नोंदवण्यासाठी वेळ मागितला. न्यायाधीशांनी काही काळ सुनावणी घेऊन पुढील सुनावणी 29 सप्टेंबरपर्यंत स्थगित करण्याचे निर्देश दिले.

ABOUT THE AUTHOR

...view details