मुंबई :आज 6 डिसेंबर 2022 महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर(Dr Babasaheb Ambedkar) यांच्या महापरिनिर्वाण दिन (Mahaparinirvan Din) आहे. या दिनानिमित्त महामानवाला अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने अनुयायी दादरच्या चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत. दादर येथील प्रसिद्ध चैत्यभूमीची प्रतिकृती निवृत्त पोलीस उपनिरीक्षक आनंदा वाघमारे यांनी साकारली आहे. पोलीस उपनिरीक्षक आनंदा वाघमारे यांची मुंबई पोलीस दलात कलाकार म्हणून ओळख आहे. पोलीस वाघमारे यांनी पॉलिसी खात्या दाखवत अनेक कारवाया केल्या, मात्र दुसरीकडे त्यांनी आपला छंद देखील जोपासला.
कलाकार मनाचा माणूस :पोलीसांची प्रतिमा म्हणजे खडूस, कठोर आणि निष्ठुर अशी असते. पण या खाकी वर्दीत देखील अनेक चांगले कलागुण लपलेले असतात निवृत्त पोलीस अधिकारी आनंदा वाघमारे यांनी दाखवून दिले आहे. आनंदा वाघमारे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले की, अनेकदा चित्रपटातून, पुस्तकांमधून पोलिसांबाबत कठोर, निष्ठुर असे चित्र रंगवले जाते. मात्र, गुन्हेगार किंवा वाईट प्रवृत्तींवर वचक ठेवण्यासाठी त्यांना तसे वागावेही लागते. पण त्यांच्यातही संवेदनशील, प्रेम आणि कलाकार मनाचा माणूस असतो. तो प्रत्येकाला दिसतोच असेही नाही, पण म्हणून पोलीसांवर असा ठपका ठेवणे योग्य नाही. पोलीसांची ही प्रतिमा बदलण्याचाही यामागे उद्देश असल्याचे वाघमारे यांनी (Retired police made Chaityabhoomi Replica) सांगितले.