मुंबई :तुम्ही ड्रिंक आणि चटपटीत चकण्यासाठी बारमध्ये जात असाल तर सावधान...कारण रेस्टॉरंट आणि बारमध्ये थेट कबुतरांचा स्टार्टरसाठी वापर होत असल्याचे ( chicken biryani in Mumbai hotels ) दिसून आले. सायन पोलिसांनी एका सेवानिवृत्त लष्कर अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल ( Retire Army officers Police complaint ) केला आहे.
निवृत्त आर्मी कॅप्टनने आणले प्रकरण उघडकीसमुंबईतील काही हॉटेलांमध्ये कबुतराचे ( Pigeon biryani instead of chicken biryani ) मांस दिले जाते या वृत्ताने खळबळ उडाली आहे. मुंबईतील एका रहिवासी सोसायटीच्या इमारतीच्या छतावर कबुतर पाळली जात होती. त्याची वाढ करून ती गुपचूपपणे हॉटेलांना विकली जात होती. एका निवृत्त आर्मी कॅप्टनने दिलेल्या तक्रारीवरून सायन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी तपास सुरू करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?सायन पोलीस ठाणे क्षेत्रातील श्री नरोत्तम निवास को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीतील ( Narottam Nivas cooperative society ) हे प्रकरण आहे. या सोसायटीत राहणारे निवृत्त आर्मीचे कॅप्टन हरेश गगलानी (७१) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. इमारतीच्या छतावर कबूतर पाळून ती काही हॉटेलांना पुरवली जातात अशी तक्रार त्यांनी पोलिसांकडे केली होती. या निवृत्त आर्मी कॅप्टनने या प्रकरणाचा तपास केला आणि काही फोटो काढले. त्यानंतर पुरावे गोळा करून या प्रकाराची तक्रार पोलीस ठाण्यात केली आहे. दरम्यान, या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. या वृत्ताने आता खळबळ उडाली आहे.