मुंबई -तब्बल ५ लॉकडाऊननंतर मुंबई आता काही प्रमाणात सुरू होणार आहे. येत्या ३, ५ आणि ८ जूनला टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथिल करण्यात येणार आहेत. प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळे व्यवसाय सशर्त सुरू केले जाणार आहे. त्याआधीच आज काही भागात मॉल, दूध, औषधांची विक्री करणाऱ्या दुकानांसह कपडे, पादत्राणांची शोरूम, हार्डवेअर, इलेक्ट्रॉनिक्स, वाहनांची डागडूजी करणारे गॅरेज सुरू करण्यात आले. यावेळी प्रत्येक आस्थापनेबाहेर नागरिकांनी खरेदीसाठी बरीच गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले.
मिशन बिगीन अगेन.. मुंबईत टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथिल, दुकाने उघण्यासाठी दुकानदारांची लगबग - रिस्टार्ट मुंबई न्युज
देशात कोरोनाने थैमान घातले. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू झाले आणि रात्रंदिवस सतत सुरू असणारी मुंबई अचानक थांबली. मात्र, आता काही प्रमाणात निर्बंध शिथिल केले जाणार आहेत. आज काही दुकाने उघडण्यात आली. यावेळी नागरिकांनी दुकानांसमोर गर्दी केली होती, तर काही दुकानांमध्ये साफसफाई केली जात होती.
रिस्टार्ट मुंबई : टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथिल, दुकाने उघण्यासाठी दुकानदारांची लगबग
देशात कोरोनाने थैमान घातले. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू झाले आणि रात्रंदिवस सतत सुरू असणारी मुंबई अचानक थांबली. मात्र, आता काही प्रमाणात निर्बंध शिथिल केले जाणार आहेत. आज काही दुकाने उघडण्यात आली. यावेळी नागरिकांनी दुकानांसमोर गर्दी केली होती, तर काही दुकानांमध्ये साफसफाई केली जात होती.
दरम्यान, व्यवसाय सुरू करताना सरकारने दिलेल्या गाईडलाइन्सचे पालन करावे लागणार आहे.
- सर्व ग्राहक तसेच कर्मचार्यांसाठी सॅनिटायझर प्रवेशद्वारावर उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
- मास्कचा वापर बंधनकारक आहे.
- सोशल डिस्टन्सिंगचे तंतोतंत पालन करणे गरजेचे
- ग्राहकांमध्ये कमीत कमी 4 ते 5 फुटाचे अंतर असणे बंधनकारक
- तापमान तपासण्यासाठी शक्य असल्यास प्रवेशद्वारावर इन्फ्रारेड थर्मामीटर वापरा
- कपड्यांच्या दुकानात प्रामुख्याने ट्रायल रूमला परवानगी नाही
- दुकानात गिऱ्हाइकांची जास्त गर्दी झाल्यास टोकन पद्धतीचा वापर करावा
अशा सूचना प्रशासनाने दिलेल्या आहेत, त्याचप्रमाणे काही व्यापारी संघटनेचे म्हणणे आहे की दुकानातील काम करणाऱ्या कामगारांना ने-आण करायची सुविधा सुरू करावी. तसेच सामान्य जनतेस गर्दी न करण्याचे आवाहन या संघटनांनी केले आहे, जेणेकरून सरकारवर लॉकडाऊन करायची वेळ येऊ नये.