महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Restoration Of Ancient Pau : वरळीतील पुरातन प्याऊच्या जीर्णोद्धार, पालिका करणार ८६ लाखांचा खर्च - इंडो-सारसेनिक पोरबंदर

मुंबईत अनेक पुरातन वास्तू आहेत (many antiquities in Mumbai) त्यांचे जतन, जीर्णोद्धार (Preservation, restoration) करण्याकडे पालिकेने लक्ष दिले आहे. त्याचाच एक भाग म्हणून वरळीतील एका पुरातन प्याऊचे पालिका जतन आणि जीर्णोद्धार करणार आहे. आनंद विठ्ठल कोळी प्याऊ ही इंडो-सारसेनिक पोरबंदर (Indo-Saracenic Porbandar) दगडात कोरण्यात आलेली आहे.या प्याऊला पूर्वीचे सौंदर्य प्राप्त करुन देताना तिथे स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही केली जाणार आहे. या कामासाठी पालिका ८६ लाख रुपये खर्च करणार आहे.

Restoration of the ancient Pau
पुरातन प्याऊच्या जीर्णोद्धार

By

Published : Jan 26, 2022, 7:50 AM IST

मुंबई :मुंबई शहरात अनेक ठिकाणी सांस्कृतिक समृद्धी, वास्तुशास्त्रीय, ऐतिहासिक वारसा असलेल्या वास्तू आहेत. त्यांचे योग्य पद्धतीने सरंक्षण होण्यासाठी राज्य सरकारने विकास नियंत्रण नियमावलीत सुधारणा करून सुधारित वास्तू जतन अधिनियमन लागू केला आहे. शहरात १८ ते १९ शतकातील सामाजिक, सांस्कृतिक ऐतिहासिक वास्तू आहेत. त्या प्याऊचा उपयोग हा वाटसरुंसह वाहनांसाठी जोडल्या जाणाऱ्या प्राण्यांची तहान भागविण्यासाठी सुविधा होती. वारसा वास्तू जतन अंतर्गत आनंद विठ्ठल कोळी प्याऊचा समावेश हा श्रेणी-३ मध्ये आहे. या प्याऊचा घुमट इंडो-सारसेनिक पोरबंदर दगडात कोरला आहे. त्याचा कळस हा नाजूक असून त्यावर फुलांची सूक्ष्म डिझाइन आहे. त्या प्याऊचा शास्त्रोक्त पद्धतीने केला जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.
पालिकेने जीर्णोद्धार कामासाठी ६४ लाख ८० हजार रुपयाची अंदाजित रक्कम मांडली होती. प्रत्यक्षात निविदा मागविल्यावर चारही कंत्राटदारांनी ५ ते २० टक्के अधिक दराने निविदा सादर केल्या. त्यातील, ५ टक्के अधिक दराने सादर झालेल्या कंत्राटदाराची निवड झाली आहे. त्यामुळे, एकूण कर, आकार मिळून त्यासाठी ८४ लाख रुपये खर्च येणार आहे. हा प्रस्ताव येत्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी मांडला जाणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details