मुंबई : राज्यातील निवासी डॉक्टरांच्या संघटनेच्या वतीने काही दिवसापूर्वीच महाराष्ट्र शासनाला इशारा दिलेला आहे की, त्यांच्या महत्त्वाच्या मूलभूत मागण्या त्वरित मान्य करा अन्यथा ते काम बंद आंदोलन (Resident Doctors Strike) सुरू करणार आहेत. त्यांच्या इशारानंतर अद्यापही शासनाने त्यांच्यासोबत बोलणी केलेली नाही. त्यामुळे आजपासून राज्यातील हजारो निवासी डॉक्टर संपावर गेले आहेत. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जर ओपीडी देखील बंद (OPD likely to remain closed) झाली तर सर्वसामान्य छोट्या-मोठ्या आजारासाठी सरकारी रुग्णालय हाच एकमेव सामान्य जनतेला आधार आहे. तो देखील कोलमडून गेलेली आहे.
प्राध्यापक डॉक्टरांना पाचारणराज्यभरात निवासी डॉक्टरांची संख्या जवळपास 5000 च्या वर आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात निवासी डॉक्टर संपावर गेल्यास आरोग्य व्यवस्थेवर त्याचा परिणाम झाला आहे. संपावर जाण्याचा निर्णय निवासी डॉक्टरांनी घेतला असला तरी अतिदक्षता विभागात कोणतीही अडचण येऊ नये याची दक्षता डॉक्टरांकडून घेण्यात आलेली आहे. अतिदक्षता विभाग सुरू राहील यासाठी निवासी डॉक्टर काम करणार आहेत. तर तिथेच आरोग्य व्यवस्था कोलमडणार नाही. यासाठी रुग्णालयांनी प्राध्यापक डॉक्टरांना पाचारण करण्यात आले आहे.
हॉस्पिटलमध्ये निवासी डॉक्टरांची संख्या अत्यंत कमीकाम करत असताना मार्ग डॉक्टर आणि समोर येणाऱ्या काही समस्या याबाबत चर्चेची विनंती मार्डकडून करण्यात आली होती. मात्र यासाठी वाट पाहूनही ३१ डिसेंबरपर्यंत प्रतिसाद न मिळाल्याने आजपासून डॉक्टर संपावर जाणार आहेत. अनेक हॉस्पिटलमध्ये निवासी डॉक्टरांची संख्या अत्यंत कमी आहे. त्यामुळे डॉक्टरांवर रोज कामाचा ताण असतो. निवासी डॉक्टरांची संख्या वाढवण्यात यावी ही मुख्य मागणी डॉक्टरांची आहे. मात्र या मागणीबाबत प्रशासन किंवा सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. आज होणाऱ्या निवासी डॉक्टरांच्या संपामुळे मुंबईतील जे जे रुग्णालय, कुपर रुग्णालय, नाय रुग्णालय, सायर येथील रुग्णालय आणि केईएम रुग्णालय येथे निवासी डॉक्टर संपावर गेले आहेत.