महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Resident Doctors Strike : राज्यात दोन जानेवारीला डॉक्टरांचा संप ; कोरोना रुग्णांची वाढती संख्या - Resident Doctors Strike

राज्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढत (Corona patients increasing) आहे. परिस्थिती बिकट होत आहे. शासनाने वेळीच मागण्या मान्य केल्या नाही, तर 2 जानेवारीपासून राज्यस्तरावरील संप सुरू करावा (Resident Doctors Strike on 2 January) लागेल, असे निवासी डॉक्टर संघटना मार्डचे उपाध्यक्ष डॉक्टर अशोक यादव यांनी सांगितले (Doctors strike in Maharashtra) आहे.

Doctors strike
डॉक्टरांचा संप

By

Published : Dec 29, 2022, 3:04 PM IST

प्रतिक्रिया देताना निवासी डॉक्टर संघटना मार्डचे उपाध्यक्ष डॉक्टर अशोक यादव

मुंबई :चीनमधील कोरोना महामारीची साथ भारतामध्ये पसरू शकते, याची भीती तज्ञ डॉक्टर व्यक्त करीत (Corona patients increasing) आहेत. या संदर्भात देश स्तरावर भारत सरकारने सर्व राज्यांना सतर्कतेचे आणि विविध चाचण्या करण्याचे आदेश दिलेले आहे. त्यानुसार विमानतळावर, सार्वजनिक ठिकाणी चाचण्या संदर्भात प्रक्रिया सुरू झाल्या (Resident Doctors Strike) आहे. मात्र गेल्या दोन दिवसात कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर दोन दिवसांनी निवासी डॉक्टर आपल्या जुन्याच मागणीसाठी संपावर जाणार (Doctors strike on 2 January) आहेत.



चौथी लाट येण्याची शक्यता :कोरोना महामारीमुळे 3 लाटा भारतीय जनतेने अनुभवल्या आहेत. या कोरोनाच्या महामारीच्या साथीमुळे अनेकजण दगावले. अनेकजण गंभीर आजारी झाले 600 पेक्षा अधिक बालके राज्यांमध्ये अनाथ देखील झाले. आता चौथी लाट येण्याची शक्यता तज्ञ डॉक्टर व्यक्त करीत आहे. यासंदर्भात केंद्र शासनाच्या सूचनेनुसार महाराष्ट्रात दोन दिवसापूर्वी मॉक ड्रिल देखील केले गेले. राज्यातील वैद्यकीय सुविधांचा आढावा घेतला. मात्र आता शासनासमोर निवासी डॉक्टरांचा होऊ घातलेला संप मोठे आव्हान (Doctors strike in Maharashtra) आहे.


अधिकाऱ्यांना निवेदन :राज्यात आजही सुमारे 1500 निवासी डॉक्टरांची भरती केली गेलेली नाही. यासंदर्भात गेल्या तीन वर्षापासून निवासी डॉक्टर संघटनेच्यावतीने राज्यभर आणि मुंबईत आंदोलन केले. वेळोवेळी शासनाला आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्याद्वारे निवासी डॉक्टरांची भरती त्वरित करावी, याबाबत समस्या मांडल्या. मात्र तीन वर्षापूर्वीच्या केलेल्या मागण्या तशाच (Doctors strike in state) आहेत.


निवासी डॉक्टरांचा संप : सर्वसामान्य साथीच्या आजारामध्ये आपली सार्वजनिक रूग्णालये तुडुंब भरून जातात. कोरोना महामारीच्या काळामध्ये तर हाहाकार उडालेला आपण पाहिला होता. अशावेळी काही खाजगी रुग्णालय कसे वागतात, याचा अनुभव सर्वांनी घेतलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर निवासी डॉक्टरांचा संप शासनाने लवकर सोडवला पाहिजे, अन्यथा शासकीय रुग्णालय अवस्था अत्यंत बिकट होणार (Corona patients Update) आहे.


राज्यस्तरावरील संप : यासंदर्भात निवासी डॉक्टर संघटना मार्डचे उपाध्यक्ष डॉक्टर अशोक यादव यांनी ईटीव्ही भारतसोबत संवाद साधताना आपली समस्या मांडली. त्यांनी म्हटले की, कोरोना महामारीच्या काळामध्ये विविध सरकारी रुग्णालयांमध्ये अहोरात्र काम करणाऱ्या डॉक्टरांना अद्यापही वेगवेगळे भत्ते दिले गेले नाही. तसेच राज्यांमध्ये 1500 च्या आसपास निवासी डॉक्टरांची भरती होणे बाकी आहे. शासनाने विचार करायला पाहिजे. जर आमच्या मागण्या शासनाने वेळीच मान्य केला नाही, तर नाईलाज असतो 2 जानेवारीपासून आम्हाला आमचा राज्यस्तरावरील संप सुरू करावा लागेल. राज्य शासनाने यावर त्वरित निर्णय घेतला पाहिजे.

ABOUT THE AUTHOR

...view details