मुंबई- केईएम रुग्णालयमध्ये निवासी डॉक्टर म्हणून काम करणाऱ्या डॉ. प्रणय जयस्वाल यांनी आज (शनिवार) त्यांच्या राहत्या रूममध्ये आत्महत्या केलेली आहे. मूळचे अमरावतीचे असणारे डॉ. प्रणव जयस्वाल यांनी काही महिन्यांपूर्वी केईएम महाविद्यालयातून मेडिकलची डिग्री मिळवून रुग्णालयातच निवासी डॉक्टर म्हणून काम पाहण्यास सुरुवात केली होती. या आत्महत्येची माहिती मिळताच भोईवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे . या संदर्भात भोईवाडा पोलिसांनी यासंदर्भात मृत्यूची नोंद केली आहे.
'या' कारणामुळे केईएमच्या डॉक्टरने केली आत्महत्या - police
केईएम रुग्णालयमध्ये निवासी डॉक्टर म्हणून काम करणाऱ्या डॉ. प्रणय जयस्वाल यांनी आज (शनिवार) त्यांच्या राहत्या रूममध्ये आत्महत्या केली आहे. प्राथमिक चोकशीत ही आत्महत्या घरगुती कारणाने झाल्याची माहिती पोलिसांनी दिली असून पुढील तपास सुरू आहे.
केईएम रूग्णालय
डॉ. प्रणय जयस्वाल यांच्या सोबत डॉ. समर्थ पटेल हे मागील 3 वर्षांपासून रूम पार्टनर म्हणून राहत होते. डॉ. प्रणय जयस्वाल हे घरगुती कारणास्तव गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून तणावग्रस्त होते, असे पोलीस तापासत समोर आले आहे. पोलिसांनी केलेल्या तपासत डॉ. प्रणय जयस्वाल यांनी स्वतःवर औषधांचा अतिवापर करून आत्महत्या केल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे.