महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'माझा मुलगा सापडला नाही, तर महापौरांनी राजीनामा द्यावा'; बेपत्ता दिव्यांशच्या वडिलांची मागणी - manhole

माझा मुलगा सापडला नाही, तर मुंबईच्या महापौरांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी दिव्यांशचे वडील सूरज सिंग यांनी केली आहे. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

सुरज सिंग

By

Published : Jul 12, 2019, 12:34 PM IST

Updated : Jul 12, 2019, 12:53 PM IST

मुंबई- दिव्यांश नाल्यात पडल्याच्या घटनेला ३६ तास उलटले आहेत. तरीही माझा मुलगा सापडलेला नाही. शोधपथक वरवरची शोधमोहीम राबवत आहे. दिव्यांश मिळाला नाही, तर मुंबईच्या महापौरांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी दिव्यांशचे वडील सूरज सिंग यांनी केली आहे.

बेपत्ता दिव्यांशचे वडिल सुरज सिंग

दिव्यांश न सापडल्याने आज गोरेगाव पूर्वमधील आंबेडकर चौकात आंदोलन करण्यात येणार आहे. यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, ही खबरदारी घेत दिंडोशी पोलिसांनी तेथे मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. श्रवण तिवारीला पोलिसांनी आंदोलनापूर्वीच ताब्यात घेतले आहे.

दिव्यांश ज्या ठिकाणी नाल्यात पडला होता त्याच्या आसपासच आता शोध मोहीम राबवण्यात येत आहे.

Last Updated : Jul 12, 2019, 12:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details