मुंबई- गोरेगावमध्ये नाल्यात पडलेल्या ३ वर्षीय मुलगा दिव्यांश २ दिवसानंतरही सापडला नाही. दरम्यान, अग्निशमन विभागाने सर्च ऑपरेशन थांबवले आहे.
दिव्यांशला शोधण्यात पालिका प्रशासनाला अपयश; २ दिवसानंतर शोधमोहिम थांबवली
बुधवारी रात्री नाल्यात पडलेल्या दिव्यांशचे शुक्रवारी सकाळपासून पुन्हा सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले होते. मात्र, दिव्यांश सापडला नसल्याने सर्च ऑपरेशन थांबवण्यात आले आहे.
दिव्यांशला शोधण्यात पालिका प्रशासनाला अपयश
बुधवारी रात्री नाल्यात पडलेल्या दिव्यांशचे शुक्रवारी सकाळपासून पुन्हा सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले होते. रात्री पडलेल्या पावसामुळे नाल्यातील पाण्याचा प्रवाह वाढला होता. त्यामुळे शोधकार्यात अडथळा निर्माण होत होता. दरम्यान, आज २ दिवसानंतरही दिव्यांश सापडला नसल्याने अग्निशमन दलाने सर्च ऑपरेशन थांबवले आहे.
Last Updated : Jul 12, 2019, 11:48 PM IST