मुंबई - चेंबूरमधील छगन मिठा पेट्रोल पंप येथे पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस दरवाढीविरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्यावतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A)- राष्ट्रीय अध्यक्ष दिपक निकाळजे व महाराष्ट्र महिला अध्यक्षा सुनीता चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
पेट्रोल, घरगुती गॅस दरवाढीविरोधात रिपांई आक्रमक - Republican Party of India latest news
कोरोना काळात मोठ्या प्रमाणात सामान्य नागरिकांना त्रास झाला आहे. आणिआता त्यानंतर प्रत्येक गोष्टीत मोठ्या प्रमाणत केलेला भाववाढ याचा आम्ही निषेध करतो असे मत महाराष्ट्र महिला अध्यक्षा सुनीता चव्हाण यांनी व्यक्त केले.
अन्यथा मोठे आंदोलन
केंद्र सरकारचा अन्यायी कृषी कायदा याचबरोबर मोठ्या प्रमाणात वाढलेले पेट्रोल-डिझेल, घरगुती गॅस तसेच राज्य सरकारच्या सक्तीने मोठ्या प्रमाणत आकारले जाणारे वीजबिल, शैक्षणिक फी या सर्व गोष्टींच्या विरोधात आज आमचे आंदोलन आहे. कोरोना काळात मोठ्या प्रमाणात सामान्य नागरिकांना त्रास झाला आहे. आणिआता त्यानंतर प्रत्येक गोष्टीत मोठ्या प्रमाणत केलेला भाववाढ याचा आम्ही निषेध करतो असे मत महाराष्ट्र महिला अध्यक्षा सुनीता चव्हाण यांनी व्यक्त केले. तसेच पुढील काळात ही भाववाढ कमी न झाल्यास सामान्य नागरिकांना सोबत घेऊन मोठे आंदोलन पुकारु, असा ही सूचक इशारा त्यांनी सरकारला दिला.