नवी दिल्ली : इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांचे आज मंगळवार (दि. 24 जानेवारी) तीन दिवसीय भारत दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या या दौऱ्यात कृषी, डिजिटल डोमेन आणि व्यापार यासह विविध क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय संबंध वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिसी बुधवारी विस्तृत चर्चा करणार आहेत. ज्यानंतर दोन्ही बाजूंनी अनेक क्षेत्रांतील संबंधांना चालना देण्यासाठी करार केले जातील अशी अपेक्षा आहे. दरम्यान, राष्ट्रपती अब्देल फताह अल-सिसी, भारतात आपले हार्दिक स्वागत आहे. आमच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून तुमची भारताची ऐतिहासिक भेट ही सर्व भारतीयांसाठी खूप आनंदाची बाब आहे. असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
इजिप्तच्या लष्कराची एक तुकडीही सहभागी होणार : परराष्ट्र राज्यमंत्री राजकुमार रंजन सिंह यांनी विमानतळावर राष्ट्रपती सिसी यांचे स्वागत केले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, या भेटीमुळे भारत-इजिप्तची दीर्घकालीन मैत्री आणखी घट्ट होईल. सिसी यांच्यासोबत एक उच्चस्तरीय शिष्टमंडळही भारत दौऱ्यावर आले आहे. इजिप्तच्या राष्ट्रपतींनी याआधी (ऑक्टोबर 2015 )मध्ये तिसऱ्या भारत-आफ्रिका मंच शिखर परिषदेत भाग घेण्यासाठी भारताला भेट दिली होती. त्यानंतर (सप्टेंबर 20160मध्ये त्यांचा राज्य दौरा झाला होता. इजिप्तच्या राष्ट्रपतींना भारताच्या प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये इजिप्तच्या लष्कराची एक तुकडीही सहभागी होणार आहे. मोदींसोबतच्या चर्चेपूर्वी बुधवारी राष्ट्रपती भवनात सिसी यांचे औपचारिक स्वागत करण्यात येणार आहे.