दादर पूर्व भागातील आरए रेसिडेन्सी टॉवरमध्ये लेव्हल 2 ची आग लागली आहे. अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे.
Breaking News : अभिनेता अन्नू कपूर दिल्लीतील रुग्णालयात भरती; छातीत होतोय त्रास - ईटीव्ही भारत ब्रेकिंग न्यूज
21:59 January 26
दादर पूर्व भागातील आरए रेसिडेन्सी टॉवरला आग
21:55 January 26
अभिनेता अन्नू कपूर दिल्लीतील रुग्णालयात भरती; छातीत होतोय त्रास
अभिनेता अन्नू कपूर यांना छातीत त्रास झाल्यामुळे दिल्लीतील रुग्णालयात दाखल केले आहे.
21:06 January 26
उद्धव ठाकरेंचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांची भागीदारी असलेल्या पुष्पक बुलियन्सविरोधात सीबीआयकडून नवीन एफआयआर
मुंबई - माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांची भागीदारी असलेल्या पुष्पक बुलियन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी विरोधात फसवणुकीचा बनावट कागदपत्र सादर करण्यास सीबीआयने नवीन गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने या संदर्भात अज्ञात व्यक्तींविरोधात 83.19 कोटी रुपयाची फसवणूक केल्या प्रकरणात नवीन गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील कथित आरोपी चंद्रकांत पाटील यांनी अटकपूर्व जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयातील विषय सीबीआय कोर्टात धाव घेतली आहे.
19:16 January 26
नाकावाटे दिली जाणारी कोरोनावरील पहिली भारतीय लस आजपासून बाजारात उपलब्ध
नवी दिल्ली -नाकावाटे दिली जाणारी कोरोनावरील पहिली भारतीय लस आजपासून बाजारात उपलब्ध होणार आहे. इन्कोव्हॅक (Incovacc) असे या लसीचे नाव आहे. भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडने तयार केलेल्या या लसीचे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडविया आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांच्याहस्ते आज वितरण करण्यात आले.
17:43 January 26
परवाना नसलेल्या खासगी रुग्णालयात गरोदर महिलेचा मृत्यू; रुग्णालय बंद करून डॉक्टरासह कर्मचारी फरार
ठाणे :भिवंडी शहरातील टेमघर पाईपलाईन येथे व्यावसायिक परवाना नसलेल्या खासगी रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे गरोदर महिलेचा मृत्यू झाला असून डॉक्टरासह कर्मचारी रुग्णालय बंद करून रात्रीच्या वेळी फरार झाले आहेत. अब्दुल रकीब शेख असे फरार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर मीनाक्षी नितेंद्र भालेकर (३१) असे गरोदर महिलेचे नाव आहे.
16:40 January 26
ध्वजारोहणावरून तेलंगाणा राज्यपाल-राज्य सरकारमध्ये खडाजंगी
हैदराबाद- ध्वजारोहणावरून तेलंगाणात वाद सुरू झाला आहे. राज्यपाल आणि राज्य सरकारमध्ये हा वाद सुरु झाला आहे. दोन महिन्यांपूर्वी मी एक पत्र लिहिले होते की हा कार्यक्रम भव्य पद्धतीने आयोजित केला जावा. पण मुख्यमंत्र्यांनी त्या पत्राला प्रतिसाद दिला नाही, असे राज्यपाल म्हणाले. तसेच त्यांच्याकडे कोणताही सार्वजनिक कार्यक्रम नव्हता. मी राजभवनातच ध्वज फडकवावा अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे राज्य सरकारने केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले नाही. तसेच तेलंगाणात संविधानाचा आदर केला जात नाही, असा आरोपही तेलंगणाचे राज्यपाल तमिलिसाई सुंदरराजन यांनी केला.
15:34 January 26
पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी चरणी पावणे दोन कोटी रुपयांचे गुप्तदान
सोलापूर - दक्षिण काशी म्हणून पंढरपूरची ओळख आहे. पंढरपूरचा विठ्ठल हा गरिबांचा देव असा समजला जातो. गरिबांचा असणारा हा देव आता भक्तांच्या दातृत्वने श्रीमंत होत असताना दिसत आहे. आषाढी एकादशीच्या सोहळ्याला मोठ्या प्रमाणावर विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी दान येत असते. तसेच अनेक भावीक हे विठ्ठलाच्या चरणी दान करत असतात. आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन व वसंत पंचमी या विठ्ठल रुक्मिणीच्या विवाह सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर विठ्ठलाच्या चरणी जालन्यातील एका महिलेने तब्बल पावणे दोन कोटी रुपयांचे दान दिले आहे.
15:10 January 26
अंधेरी पूर्वमधील साकीनाका येथील अनिस कंपाऊंडला लागली आग
मुंबई - अंधेरी पूर्व येथील साकीनाका येथील अनिस कंपाऊंडमध्ये आग लागली. 4 अग्निशामक इंजिन घटनास्थळी दाखल झाले आहेत. अद्याप कोणतीही जीवितनाही झाल्याचे वृत्त हाती आले नाही.
14:48 January 26
मुंबईत प्रजासत्ताक दिन संचलनामध्ये यंदा प्रथमच तेलंगणा पोलीस पथक
मुंबई-भारतीय प्रजासत्ताकाच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज शिवाजी पार्क मुंबई येथे झालेल्या मुख्य शासकीय सोहळ्यात राष्ट्रीय ध्वज फडकवून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी राज्यपालांनी प्रजासत्ताक दिन संचलनाचे निरीक्षण केले व विविध पथकांकडून मानवंदना स्वीकारली.
14:29 January 26
काँग्रेसने अहमदनगर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी केली बरखास्त
नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिलेल्या उमेदवाराचा प्रचार न करता अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिल्याने अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटी बरखास्त करण्यात आली आहे. अहमदनगर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुरेश साळुंखे यांनाही पक्षातून निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. टिळक भवन येथे पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे.
13:50 January 26
लवकर ठाण्यात जाहीर सभा घेवून समाचार घेणार-उद्धव ठाकरे
ठाणेकरांच्या आरोग्याची काळजी आहे. त्यामुळे येथे शिबिराचे आयोजन केले आहे. पुन्हा राजकीय स्वास्थ्याबाबत काळजी घेऊ. माझ्या सोबत राहिलेले लोक हेच निखारे आहेत. लवकरात लवकर ठाण्यात जाहीर सभा घेवून समाचार घेणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. ते आज ठाणे दौऱ्यावर आहेत.
13:17 January 26
मोटारसायकल चोरणाऱ्या व्यक्तीला अटक; 13 दुचाकी जप्त
ठाणे जिल्ह्यातील कल्याण परिसरात महागड्या मोटारसायकली चोरणाऱ्या १९ वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली असून १३ वाहने जप्त केली आहेत, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
13:13 January 26
हिंडेनबर्ग रिसर्चच्या विरोधात अदानी समूह कायदेशीर कारवाई करण्याची शक्यता
हिंडेनबर्ग रिसर्चच्या विरोधात अदानी समूह कायदेशीर पर्यायांवर विचार करत आहे. हिंडेनबर्ग रिसर्चने अदानीमध्ये अनियमितता असल्याचा दावा केला आहे.
13:07 January 26
कोणीही शरद पवार यांच्याबद्दल उलटसुलट उद्गार काढू नये, सहन केले जाणार नाही- जितेंद्र आव्हाड
उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी उध्दव गटाच्या कार्यकर्त्यांसोबत माजी मंत्री राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड हे देखील उपस्थित आहेत. उध्दव ठाकरे जिथे जिथे जातील तिथे त्यांच्यासोबत असणार असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. वंचितमध्ये कोणीही शरद पवार यांच्या बद्दल उलटसुलट उद्गार काढू नये, सहन केले जाणार नाही असे सांगितले.
11:55 January 26
नवाब मलिक यांच्या मुलावरील पोलिसांच्या कारवाईवर न्यायालयाचे ताशेरे
नवाब मलिक यांच्या मुलावरील पोलिसांच्या कारवाईवर न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. तपास अधिकाऱ्यांनी नियमांचे पालन केले नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
11:54 January 26
लोकप्रतिनिधी आहोत म्हणून आपण मालक नाही, वळसे पाटील यांची बांगर यांच्यावर टीका
विधानसभा, लोकसभा किंवा कुठल्याही सभागृहाचे सदस्य असो म्हणून आपण मालक होत नाही. त्यांच्या हातून बेकायदेशीर घटना घडत आहे. त्यांच्या नेतृत्वाने त्यांना आवरावे अशी टीका राष्ट्रवादी नेते दिलीप वळसे पाटील यांनी शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्यावर केली आहे.
11:25 January 26
लडाखचा चित्ररथ पर्यटनावर आधारित, अनेकांचे लक्ष घेतले वेधून
लडाखचे पर्यटन आणि संमिश्र संस्कृती' या थीमवर आधारित, त्याची झलक उत्तराखंड च्या निसर्ग आणि उर्वरित जगाशी असलेल्या सुसंवादी संबंधाचे सार दाखविते.
11:24 January 26
स्वच्छ हरित ऊर्जेवर गुजरातचा चित्ररथ
प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये 'त्रिपुरामध्ये पर्यटन आणि सेंद्रिय शेतीद्वारे शाश्वत उपजीविका' या थीमसह त्रिपुराचा चित्ररथ, महिलांच्या सक्रिय सहभागासह प्रदर्शित करण्यात आली. त्यात महामुनी बुद्ध मंदिरही दाखवले आहे. 2023 च्या प्रजासत्ताक दिनी 'स्वच्छ-हरित ऊर्जा कार्यक्षम गुजरात' या थीमवर गुजरातचा चित्ररथ उर्जेचे अक्षय स्रोत दर्शविते.
11:03 January 26
मौजपूरीच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकावर कारवाई करा, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न
मौजपूरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्यावर कारवाई करण्यासाठी आज प्रजासत्ताक दिनी महिलेने आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. या महिलेला सदर बाजार पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
10:59 January 26
कर्तव्यपथावरून पथसंचलनात विविध रेजिमेंटचा सहभाग, सैन्यदलाची राष्ट्रपतींना मानवंदना
प्रजासत्ताक दिनाची परेड परमवीर चक्र आणि अशोक चक्र विजेत्यांनी सुरू झाली. इजिप्शियन सशस्त्र दलांचा एकत्रित बँड आणि मार्चिंग तुकडी प्रथमच कर्तव्य मार्गावर चालली आहे. या तुकडीचे नेतृत्व कर्नल महमूद मोहम्मद अब्देल फताह अल खरासावी यांनी केले आहे. भारतीय नौदलाच्या ब्रास बँडमध्ये 80 संगीतकारांचा समावेश आहे. ज्यात भारतीय नौदलाची गाणी 'जय भारती' वाजवताना प्रजासत्ताक दिनी कार्तव्य पथावर कूच केले. 27 एअर डिफेन्स मिसाईल रेजिमेंटची आकाश शस्त्र प्रणाली, कॅप्टन सुनील दशरथे यांच्या नेतृत्वाखालील 'अमृतसर एअरफील्ड' आणि 512 लाइट एडी मिसाइल रेजिमेंट (SP) च्या लेफ्टनंट चेतना शर्मा यांच्या तुकडीने मार्चमध्ये सहभाग घेतला. लेफ्टनंट प्रज्ज्वल कला यांच्या नेतृत्वाखाली 861 क्षेपणास्त्र रेजिमेंटच्या ब्राह्मोसची तुकडी कर्तव्यपथावरील परेडमध्ये भाग घेतला. 3 लडाख स्काउट्स रेजिमेंटचे कॅप्टन नवीन धत्तेरवाल यांच्या नेतृत्वाखाली क्विक रिअॅक्शन फायटिंग व्हेईकलची तुकडी कर्तव्य मार्गावरून खाली कूच केले. लडाख, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशात कार्यरत असलेल्या सैन्यासाठी हे वाहन आदर्शपणे तयार करण्यात आले आहे. 75 आर्मर्ड रेजिमेंटच्या अर्जुनच्या मुख्य बॅटल टँकची तुकडी कार्तव्य मार्गावरून खाली कूच करते. याचे नेतृत्व कॅप्टन अमनजीत सिंग यांनी केले. 61 व्या घोडदळ, जगातील एकमेव घोडेस्वार रेजिमेंट आहे. या तुकडीने मार्च केले आहे. 'अश्वशक्ती यशोबल' हे त्यांचे ब्रीदवाक्य आहे.
10:32 January 26
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याहस्ते ध्वजवंदन, प्रजासत्ताक दिनाचा राजधानीत उत्साह
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याहस्ते ध्वजवंदन करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्तव्यपथावर पोहोचले आहेत. त्याचबरोबर इजिप्तचे अध्यक्षदेखील प्रमुख पाहुणे म्हणून कर्तव्यपथवर पोहोचले आहेत.
10:01 January 26
पहाटेच्या शपथविधीमुळे राष्ट्रपती राजवट काढण्यास मदत-जयंत पाटील
पहाटे शपथविधी हा जाणीवपूर्वक करण्यात आला नाही. तर या शपथविधीमुळे राष्ट्रपती राजवट काढण्यास मदत झाल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
10:00 January 26
भाजप नेते अद्वय हिरे ठाकरे गटात करणार प्रवेश
उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत भाजप नेते अद्वय हिरे उद्या ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.
09:15 January 26
मेलबर्नमधील 3 हिंदू मंदिरांच्या तोडफोडीचा भारतीय उच्चायुक्तांकडून निषेध
मेलबर्नमधील 3 हिंदू मंदिरांच्या तोडफोडीच्या गंभीर त्रासदायक घटनांचा उच्चायुक्तांनी तीव्र निषेध केला. हे शांततापूर्ण बहु-विश्वास भारतीय-ऑस्ट्रेलियन समुदायामध्ये द्वेष आणि फूट पेरण्याचे स्पष्ट प्रयत्न असल्याचे कॅनबेरा येथील भारतीय उच्चायुक्तांनी म्हटले आहे.
09:13 January 26
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. स्वातंत्र्य सेनानींचे स्वप्न साकार करण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याचे पंतप्रधानांनी आवाहन केले आहे.
09:12 January 26
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासकीय निवासस्थानी केले ध्वजारोहन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानी राष्ट्रध्वज फडकवला आहे.
09:12 January 26
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ध्वजारोहण
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवाणी यांनी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे तिरंगा फडकवला.
09:09 January 26
ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी भारतीयांना दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा
भारतीय प्रजासत्ताक हा दिवस आधुनिक भारताच्या समृद्ध संस्कृती आणि प्रभावी कामगिरीचा सन्मान करण्याचा क्षण आहे. भारतीय वारसा असलेल्या सर्वांसाठी त्यांच्या भारतावरील सामायिक प्रेम आणि त्याच्या भविष्यातील सामायिक विश्वासाभोवती एकत्र येण्याची ही संधी आहे. प्रजासत्ताकदिन साजरा करणाऱ्या सर्वांना मी शुभेच्छा देतो, अशा शब्दात ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
09:09 January 26
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते शिवाजी पार्कवर होणार ध्वजारोहण
शिवाजी पार्कवर ७४ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते थोड्याच वेळात ध्वजारोहण होणार आहे.
08:08 January 26
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात ध्वजारोहण
प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात राष्ट्र ध्वज फडकवण्यात आला. यावेळी नागपूर महानगर सह संघटक श्रीधर जी गाडगे यासह पदाधिकारी आणि शेकडो स्वयंसेवक उपस्थित होते. रेशीमबाग येथील स्मृती मंदिर परिसरातील डॉ. हेडगेवार स्मारक समितीच्या वतीने प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला प्रख्यात फिजिशियन डॉ. सुशील मानधनिया हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
07:54 January 26
उद्धव ठाकरे आज एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात जाणार
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राजकीय मैदान असलेल्या ठाण्याला भेट देणार आहेत. जूनमध्ये सत्ता गमावल्यानंतर त्यांचा पहिला शहर दौरा आहे.
07:49 January 26
मुंबईत २९ मजली इमारतीला आग; 10 रहिवासी रुग्णालयात दाखल
मुंबईतील 29 मजल्यांच्या निवासी इमारतीला मध्यरात्री बुधवारी आग लागली. त्यानंतर 10 रहिवाशांना गुदमरल्यासारखे आणि इतर समस्यांमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
07:27 January 26
बियाणी हत्या प्रकरणातील आरोपीला एनआयएकडून अटक
नांदेडमधील बियाणी हत्या प्रकरणातील आरोपी दीपक सुरेश रांगा याला एनआयएने अटक केली आहे.
07:23 January 26
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत वाहनांची तपासणी सुरू
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत सुरक्षा आणि वाहतूक पोलीस कर्मचारी वाहनांची काटेकोरपणे तपासणी करत आहेत. प्रजासत्ताक दिनापूर्वी संपूर्ण राष्ट्रीय राजधानीत सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
07:22 January 26
मेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे फेसबुकस इन्स्टाग्राम पुन्हा सुूरू होणार
मेटाने घोषणा केली की अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे फेसबुक आणि इंस्टाग्राम खाती येत्या आठवड्यात पुन्हा सुरू केली जाणार आहे. कॅपिटल येथे दंगल घडवून आणणाऱ्या पोस्टमुळे ट्रम्प यांची खाती दोन वर्षांपूर्वी निलंबित करण्यात आली होती.
07:22 January 26
आयबीएम कंपनी 3,900 कर्मचाऱ्यांना घरी पाठविणार
आयबीएम कंपनी 3,900 कर्मचाऱ्यांना नोकरीतून काढून टाकणार आहे.
07:21 January 26
दंतेवाडात २५ नक्षलवाद्यांनी केले आत्मसर्मपण
दंतेवाडा येथे २५ जानेवारी रोजी १० नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. अधिकाधिक लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि प्रदेश नक्षलवादमुक्त करण्यासाठी पोलीस आणि CRPF यांचे प्रयत्न सुरू आहेत. दंतेवाडा सामान्य स्थितीकडे जात असल्याचे दंतेवाडाचे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सांगितले.
07:20 January 26
हिमवृष्टी होत असतानाही 7,200 फूट उंचीवर भारतीय सैन्यदलाची गस्त सुरू
जम्मू-कश्मीरमध्ये हिमवृष्टी होत असतानाही 7,200 फूट उंचीवर भारतीय सैन्यदलाची गस्त सुरू आहे.
06:47 January 26
Maharashtra Breaking News : महाराष्ट्रासह देशभरात प्रजासत्ताक दिन उत्साहाने होतोय साजरा, महाराष्ट्राच्या चित्ररथातून होणार स्त्रीशक्तीचा जागर
मुंबई : देशात ७४ वा प्रजासत्ताक दिन उत्साहाने साजरा होत आहे. राजपथावर सैन्यदलाचे संचलन होणार आहे. कर्तव्यपथावर यंदा महाराष्ट्राच्या चित्ररथातून स्त्रीशक्तीचा जागर होणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व गेट ऑफ इंडिया व राजभवनाला रोषणाई करण्यात आलेली आहे.