मुंबई- कोरोनाच्या विरोधात अहोरात्र परिश्रम करणाऱ्या डॉक्टर आणि आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना सरकारकडून विमाकवच देण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील पत्रकार, फोटोग्राफर आणि कॅमेरामॅन यांनाही विमाकवच मिळावे, अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक ट्विट करून केली आहे.
'पत्रकारांनाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विमा कवच मिळावे' - supriya sule media insurance
सरकार व समाज यांच्यात दुवा म्हणून पत्रकार व सहकारी सध्या कोरोना विषाणूची भीती असतानादेखील कार्यरत आहे. त्यांचाही अनेकांशी संपर्क येतो, यामुळे त्यांना विमा कवच मिळावे, अशी सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना ट्विटवरून विनंती केली आहे.
सु्प्रिया सुळे
खासदार सुळे आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, की सरकार व समाज यांच्यात दुवा म्हणून पत्रकार व सहकारी सध्या कोरोना विषाणूची भीती असतानादेखील कार्यरत आहेत. त्यांचाही अनेकांशी संपर्क येतो, यामुळे त्यांना विमाकवच मिळावे, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांना ट्विटवरून केली आहे.
हेही वाचा-'मुंबईत कोरोनाचा फैलाव थांबविण्यासाठी प्रभागांमध्ये भरारी पथके करणार तपासणी'