मुंबई : मुंबईमध्ये मोकळ्या जागेवर अतिक्रमण होत ( Encroachments on Open Spaces in Mumbai ) असतात. असाच एक प्रकार समोर आला आहे. मालाड पश्चिम येथील मढ - मार्वे भागात खारफुटीच्या जमिनीवर भूमाफियांकडून ( Unauthorized Construction Carried Out by Filling in Madh-Marve ) भराव टाकून अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. यातील बहुतांश जागा जिल्हाधिकारी, वन विभाग, म्हाडाची आहे. तरीसुद्धा या यंत्रणा अनधिकृत बांधकामाकडे दुर्लक्ष करीत आहेत. भराव टाकणा-या ट्रक, डंपरवर दंडात्मक कारवाई करण्याऐवजी ती वाहने जप्त करून बांधकाम करणारे झोपडीदादा, भूमाफिया यांच्याविरोधात 'एमपीडीए'अंतर्गत कारवाई करून ( Malad P North Office of Municipality has Given Letter to Police ) त्यांना तडीपार करावे, असे पत्र पालिकेच्या मालाड-पी उत्तर कार्यालयाने पोलिसांना दिले आहे.
कांदळवनात झोपडपट्टी बनवण्याचा प्रयत्न :निसर्गाचा समतोल राखण्यासाठी व शहरात समुद्राचे पाणी येऊ नये यासाठी कांदळवन खूप महत्वाचे आहे. मालाड मढ-मार्वे परिसरात ५० टक्के जागा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मालकीची आहे. तर कांदळवनांची २० टक्के, १० टक्के म्हाडा, १० टक्के खासगी आणि पालिकेच्या मालकीची १० टक्के जागा आहे. ही जागा पाणथळाची असून, येथे मोठ्या प्रमाणात कांदळवन (खारफुटी) आहे. या जागेत भूमाफिया भरणी करून झोपडपट्टी बनवण्याचा प्रयत्न करीत आहेत. या जागेवर भरणी करण्यासाठी मोठ्या ट्रकचा वापर केला जातो आहे. त्यामुळे येथे खड्डे पडल्याने वाहतूक कोंडी होते.