महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Amey Ghole Claims : अमेय घोलेंचा सहा महिन्यांनंतर आदित्य ठाकरेंसोबत असल्याचा दावा; शिवसैनिकांकडून जोरदार टीकास्त्र - Amey Ghole Claims to be with Aditya Thackeray

शिवसेनेतील फुटीनंतर माजी नगरसेवक अमेय घोले ( Repentance to Former Councilor Amey Ghole ) यांनी ठाकरेंपासून चार हात लांब झाले. युवासेनेच्या बैठकांना हजेरी लावणे सोडून ( Claimed to be with Aditya Thackeray After Six Months ) दिले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख ( Strong Criticism From Shiv Sainiks ) आदित्य ठाकरे यांचे फोटोदेखील बॅनरवरून हटवले. शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा यामुळे जोरदार रंगली होती. अमेय घोले यांना आता तब्बल सहा महिन्यांनी उपरती झाली असून, त्यांनी 'मी ठाकरें'सोबत असल्याचा दावा केला आहे.

Amey Ghole Claims
अमेय घोलेंचा सहा महिन्यांनंतर आदित्य ठाकरेंसोबत असल्याचा दावा; शिवसैनिकांकडून जोरदार टीकास्त्र

By

Published : Jan 4, 2023, 5:11 PM IST

मुंबई :शिवसेनेचे माजी नगरसेवक अमेय घोलेंनी आज पत्रकार परिषद घेऊन त्यांची आपली भूमिका ( Repentance to Former Councilor Amey Ghole ) स्पष्ट केली. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या ( Amey Ghole Claims to be with Aditya Thackeray ) आहेत. तर आगामी निवडणुकीत पराभव डोळ्यांसमोर दिसल्याने घोलेंकडून ( Aditya Thackeray After Six Months ) सारवासारव करण्याचा प्रयत्न असल्याचे टीका शिवसैनिकांनी ( Strong Criticism From Shiv Sainiks ) केली. महाराष्ट्राच्या मनात आजही शिवसेना, युवासेना बाळासाहेबांची आहे. आम्हीदेखील कायम शिवसैनिकच राहणार आहोत. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली युवासेना आम्ही बाळाप्रमाणे सांभाळली आहे. तसेच आदित्य ठाकरे आणि आम्ही बघितलेले स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

घोले यांच्या दाव्यावर शिवसैनिकांकडून जोरदार टीकास्त्रशिवसेनेतील फुटीनंतर मोठ्या प्रमाणात पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाची वाट धरली. आदित्य ठाकरेंचे एकेकाळचे निकटवर्तीय समजले जाणारे अमेय घोलेदेखील पक्षांपासून चार हात लांब गेले. युवासेनेचे कोषाध्यक्षासारखे महत्वाचे पद असताना त्यांनी कोअर कमिटीच्या बैठकींना दांडी मारण्यावर भर दिला आहे. मतदारसंघात विविध कार्यक्रम राबवले. अनेक बॅनर्स लावले. शिवसेना, युवासेनेला यातून वगळण्यात आले. आदित्य ठाकरेंचे फोटेदेखील त्या बॅनरवर लावण्याचे घोले यांनी टाळले होते. त्यामुळे युवासेना सोडल्याची जोरदार चर्चा रंगली. आता सहा महिन्यांनंतर अमेय घोले यांनी मी शिवसैनिक असल्याचा दावा केला आहे. घोले यांच्या दाव्यावर शिवसैनिकांकडून जोरदार टीकास्त्र सोडले जात आहे. पराभव डोळ्यांसमोर दिसल्याने घोले पुन्हा शिवसैनिक असल्याचा दावा करीत असल्याचे शिवसैनिकांचे म्हणणे आहे.

सध्या युवासेनेत मोनोरेल तयारसध्या युवासेनेत मोनोरेल तयार झाली आहे. आमचा फिडबॅक आदित्य ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचत नव्हता. स्थानिक स्तरावरील नियुक्त्या मेरीटवर झालेल्या नाहीत. आदित्य ठाकरे यांच्याकडे याबाबत तक्रार केली होती. माझ्या वॅार्डमध्ये सर्वाधिक शपथपत्र देण्यात आली. पद ही ॲान मेरिटच दिली जातात. परंतु, को‌अर कमिटीच्या सदस्यांना विचारले जात नव्हते. त्यामुळे मी नाराज होतो. आता माझी भूमिका आदित्य ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवल्याचे, अमेय घोले यांनी पत्रकार परिषदेत घेऊन सांगितले.

आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई यांचे मला भावाप्रमाणे सहकार्य2014 मध्ये तिकीटासाठी काही जण दारोदार फिरत होते. हे सर्वश्रुत आहे. मलासुद्धा यावर काही बोलायचे नाही. वरिष्ठांच्या बाबतीत मी कुठेही नाराज नाही. परंतु, काही लोक वातावरण गढुळ करीत आहेत, असा शिवसेना, युवासेनेतील गटबाजीवर आरोप केला. तसेच व्हाॅट्सअॅप ग्रुपमध्ये लॅाजिकल चर्चा होत नाही. त्यामुळे तो सोडला होता. परंतु, माझ्या लोकांसाठीच्या कामात याचा काहीच अडथळा निर्माण होणार नाही. आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई यांनी मला भावाप्रमाणे, मित्राप्रमाणे सहकार्य केले आहे. मी त्यांच्या सकारात्मक प्रतिसादाची वाट पाहत आहे. मी युवासेनेत आदित्य ठाकरे यांच्यासोबतच आहे, असे अमेय घोलेंनी स्पष्ट केले.

ABOUT THE AUTHOR

...view details