महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 16, 2021, 1:16 PM IST

ETV Bharat / state

धनंजय मुंडे प्रकरण : रेणू शर्माचा पुन्हा नोंदवला जाणार जबाब

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. एका महिलेने त्यांच्या विरोधात लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. यावरून विरोधकांनी गोंधळ घातला असून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.

Renu Sharma
रेणू शर्मा

मुंबई -राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात बलात्काराची तक्रार केलेल्या रेणू शर्माचा पुन्हा जबाब नोंदवला जाणार आहे. डीएननगर पोलिसांनी शर्माला पोलीस ठाण्यामध्ये बोलावले आहे. या अगोदर १४ जानेवारीला सहायक पोलीस आयुक्तांसमोर त्यांचा जबाब नोंदवण्यात आला होता. यापूर्वी त्यांनी धनंजय मुंडें विरोधात लेखी तक्रार दाखल केली होती.

रेणू शर्माचा पुन्हा जबाब नोंदवला जाणार आहे

काय आहे प्रकरण -

रेणू शर्मा या महिलेने धनंजय मुंडे यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. या महिलेचा आरोप आहे की, 'धनंजय मुंडे यांनी मला सांगितले की तुम्हाला गायक बनायचे असेल तर मी चित्रपट जगतातील बड्या चित्रपट दिग्दर्शक आणि निर्मात्यांसमवेत तुझी भेट करुन देतो आणि बॉलीवूडमध्ये लॉन्च करेन. याचे आमिष दाखवून त्यांनी माझ्या इच्छेविरूद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मुंडे यांनी सतत लैंगिक अत्याचार केले. जेव्हा-जेव्हा माझी बहीण कामानिमित्त बाहेर पडली, तेव्हा ते मला शारीरिक संबंध बनवण्यास भाग पाडत असत. बलात्काराचा आरोप झाल्यानंतर भाजपाने धनंजय मुंडे यांच्या विरोधात आघाडी उघडली आहे. त्यांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मात्र, धनंजय मुंडे यांनी या आरोपांचे खंडन केले आहे.

या महिलेच्या बहिणीसोबत मी 2003 पासून परस्पर सहमतीने संबंधात होतो. ही बाब माझे कुटुंबीय, पत्नी व मित्र परिवार यांना माहित होती. या परस्पर सहमतीच्या संबंधामधून आम्हाला एक मुलगा व एक मुलगी, अशी दोन मुले झाली. या दोन्ही मुलांना मी माझे नाव दिले आहे. शाळेच्या दाखल्यापासून ते सर्व कागदपत्रांमध्ये या मुलांना पालक म्हणून माझेच नाव आहे, ही मुले माझ्यासोबतच राहतात. माझे कुटुंबीय, पत्नी आणि माझी मुले यांनी देखील या मुलांना कुटुंबीय म्हणून सामावून घेतले असून स्वीकृती दिलेली आहे. ही महिला माझ्या मुलांची माता असल्यामुळे त्यांची मी सर्वोतोपरी पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली आहे. मी त्यांना मुंबईत सदनिका घेण्यास मदत केली आहे. मी त्यांना विमा पॉलिसी व त्यांच्या भावाला व्यवसाय स्थापित करण्यास मदत केलेली आहे. या सर्व कृती मी सद्भावनेने केलेल्या आहेत, अशी माहिती मुंडे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्ट केली.

ABOUT THE AUTHOR

...view details