मुंबई - सुलोचना चव्हाण यांचे निधन ( Sulochana Chavan passes away ) म्हणजे मराठी मनोरंजन सृष्टीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्यांच्या निधनाची माहिती त्यांचे पुत्र विजय चव्हाण यांनी दिली. सांस्कृतिक क्षेत्रातील त्यांचं योगदान लक्षात घेता भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांच्या सन्मान केला होता. राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना हा पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
Sulochana Chavan passed away : प्रसिद्ध लावणी गायिका सुलोचना चव्हाण अनंतात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार - Sulochana Chavan Passes Away
प्रसिद्ध लावणीसम्राज्ञी व ज्येष्ठ पार्श्वगायिका सुलोचना चव्हाण ( Sulochana Chavan ) यांच्या पार्थिवावर आज मरीन लाईन सचिन चंदनवाडी स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार ( Sulochana Chavan cremated state pomp ) करण्यात आले. सुलोचना चव्हाण यांचे वृद्धापकाळाने ( Playback singer Sulochana Chavan ) वयाच्या 92 व्या वर्षी मुंबईतील गिरगाव फणसवाडीमधील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास ( Sulochana Chavan passes away ) घेतला.
शासकीय इतमामात अंत्यसंस्कार -सुलोचना दीदींचे सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान पाहता भारत सरकारने त्यांना पद्म पुरस्काराने सन्मानित केले होते. अशा थोर व्यक्तीच्या निधनामुळे त्यांच्यावरती शासकीय ईतमामात अंत्यसंस्कार ( Sulochana Chavan cremated state pomp ) करण्यात आले. त्यांना मुंबईचे पालक मंत्री म्हणून दीपक केसरकर यांनी पुष्पचक्र अर्पण केलं तर मुंबई पोलिसांनी त्यांना मानवंदना दिली.
सुलोचनादीदींची अजरामर गाणी -सुलोचना चव्हाण त्यांच्या लावण्या याचं नातं हे काही वेगळंच होतं. त्यांनी गायलेल्या लावण्या, त्यांचा ठसका हा काही औरच होता. त्यांच्या लावण्या मराठी मनोरंजन सृष्टीत आजही अजरामर आहेत. या लावण्यांमध्ये 'फड सांभाळ तुऱ्याला बघ आला...' 'तुझ्या पाडाला पिकलाय आंबा...' 'मला म्हणत्यात पुण्याची मैना...' अशा लावण्यांचा समावेश आहे. ज्या लावण्यांच्या तालावर आजही अनेक जण थीरकतात.