मुंबई -एकीकडे मुंबईचे सौंदर्यीकरण करण्याचे काम सुरू असताना दुसरीकडे मात्र मुंबईत ठिकठिकाणी मुंबई विद्रुप करणारे अनधिकृत पोस्टर्स बॅनर्स होडिग्ज लावले जात आहेत. त्यामूळे अनधिकृत पोस्टर्स बॅनर्स होडिग्ज त्वरित हटवा, असे आदेश पालिका आयुक्त व प्रशासक डॉ इकबाल सिंग चहल ( Municipal Commissioner Iqbal Singh Chahal ) यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्याचवेळी मुंबई विद्रूप करू नका असे आवाहन आयुक्तांनी नागरिकांना केले आहे.
कारवाईची मोहिम हाती घ्या -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांनी मुंबईचे सुशोभीकरण करण्याचे ( Beautification of Mumbai ) आदेश दिले असून ५०० ठिकाणी काम सुरू आहेत. या कामाचा आढावा पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी घेतला. अनधिकृत होर्डिंग्ज, बॅनर्स, पोस्टर्स झळकवण्यास मुंबई उच्च न्यायालयाने सक्त मनाई केली आहे. तरीही राजकीय पक्षांचे बॅनर्स पोस्टर्स व होडिंग्ज ठिकाणी ठिकाणी झळकलेले दिसतात. पालिका अधिकाऱ्यांनी अशा बॅनर्सवर कारवाईची मोहिम हाती घ्यावी असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. तसेच मुंबईला विद्रुप करु नका असे आवाहन पालिका आयुक्तांनी नागरिकांना केले आहे.