मुंबई - विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू झाल्याने विविध राजकीय पक्षांचे फलक प्रशासनाकडून काढण्यात येत आहेत. विरोधी पक्षांच्या फलकांप्रमाणेच राज्यभरातील पेट्रोलपंपावर लावलेले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फलक तसेच इतर सरकारी जाहिरातींचे फलकदेखील तत्काळ काढावेत, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रदेश कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे.
पेट्रोल पंपांवरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फलक काढा - सचिन सावंत - सचिन सावंत काँग्रेस
आचारसंहिता लागू झाल्याने विविध राजकीय पक्षांचे फलक प्रशासनाकडून काढण्यात येत आहेत. आचारसंहितेनुसार फलक काढण्यावर कुणाचाही आक्षेप नाही, पण या नियमानुसार विरोधी पक्षांच्या फलकांप्रमाणेच राज्यभरातील पेट्रोलपंपावर लावलेले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फलक तदेखील तत्काळ काढावेत, अशी मागणी यावंत यांनी केली आहे.
यासंदर्भात माहिती देताना सावंत म्हणाले की, निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणुकीच्या घोषणेनंतर राज्यभरात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. आचारसंहितेनुसार फलक काढण्यावर कुणाचाही आक्षेप नाही, पण या नियमानुसार सर्वच राजकीय फलक निवडणूक आयोगाने काढणे अपेक्षित आहे. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र असलेले फलक आजही राज्यातील बहुतांश पेट्रोलपंपांवर लावलेले आहेत. सर्व राजकीय पक्षांसाठी एकच नियम असताना या फलकांबद्दल प्रशासन बोटचेपी भूमिका का घेत आहे, असा सवालही सावंत यांनी उपस्थित केला आहे. आचारसंहितेच्या नियमानुसार प्रशासनाने सत्ताधारी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहिरात करणारे फलक काढून घ्याव्येत, अशी मागणी सावंत यांनी केली आहे.
हेही वाचा -अॅक्सिस बँकेतील घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा - नाना पटोले
यासोबतच महाराष्ट्र शासनाकडून राज्य परिवहन विभागाची बस स्थानके, एस. टी. बसेस, रेल्वे स्थानके तसेच विविध महापालिकांच्या परिवहन विभागाच्या बसेसवरही सरकारी जाहिराती लावलेल्या आहेत. निवडणुकीची आचारसंहिता लागल्यावर निवडणूक आयोग हे सर्व फलक काढण्याचे आदेश देईल, अपेक्षा होती. पण, तसे न झाल्याने नाईलाजाने ही तक्रार करावी लागत आहे, असेही सावंत यांनी स्पष्ट केले आहेे.