मुंबईRemdesivir Scam Case : तपास करताना आरोपींनी दिलेल्या जबाबात महापौर बंगल्यावर कोविड काळात झालेल्या बैठकीत रेमडेसिवीरचे कंत्राट कोणाला द्यायचे किंवा कोणाला नाही याबाबतच्या झालेल्या बैठकीत पुण्य पारीख देखील हजर असल्याची माहिती मिळाली. (remdisivir injection scam) यामुळे पारीखला चौकशीसाठी बोलावले असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. पुण्य पारीखचे बँक स्टेटमेंट पडताळणी सुरू असून अद्याप कोणतेही संशयास्पद व्यवहार सापडले नसल्याची माहिती त्यांनी दिली. (Financial Offenses Branch)
पारीख आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय:5.96 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप करण्यात आला असून ज्यामध्ये इंजेक्शनचे दर वाढवले गेले आणि 650 रुपयांऐवजी १५५८ रुपये प्रति नग दाखवले गेले. याच प्रकरणांमध्ये जारी केलेल्या समन्सनुसार पुण्य पारीख आज आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांसमोर चौकशीसाठी उपस्थित झालेले होते. सात तास पुण्य पारीख यांची मुंबईतील आर्थिक गुन्हे शाखा कार्यालयात चौकशी पार पडली. ते शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय असल्याचे बोलले जात आहे. पुण्य पारीख यांना चौकशीबाबत विचारले असता त्यांनी पण आरोपच काही नाही आहेत. जे काही आहे ते संबंधित अधिकाऱ्यांना विचारा, असं बोलून या व्यतिरिक्त काहीही बोलण्यास नकार देत ते निघून गेले.
हजारो इंजेक्शनचा रेकॉर्डच नाही:खिचडी आणि जंबो कोविड सेंटर कथित घोटाळ्यानंतर कोविड काळात मुंबई महापालिकेने रेमेडीवीर इंजेक्शन खरेदी घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा नोंदवला आहे. मुंबई महापालिकेतून 10000 हून अधिक रेमडेसिवीर इंजेक्शन गायब झाल्याची तक्रार किरीट सोमैय्या यांनी काही आठवड्यापूर्वी मुंबई पोलीस, ईडी आणि आयकर विभागाकडे केली होती. प्राथमिक चौकशी केल्या नंतर मुंबई पोलीस आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने आता यावर गुन्हा दाखल केला आहे. मुंबई महापालिकेच्या खरेदी खात्याने हजारो रेमडेसिवीरची अप्रत्यक्षरित्या खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. 2020 मध्ये एक रेमडेसिवीर इंजेक्शन 4300 रुपयांना दिले. तेच 2021 मध्ये रेमडेसिवीरचे करार असतानासुद्धा 1600 रुपयात रेमडेसिवीरचे इंजेक्शन विकत घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. करोडो रुपयांचे रेमडेसिवीर इंजेक्शन विकत घेतल्यानंतर त्याचे वितरण कसे झाले, याचा तपास करावा. तसेच हजारो रेमडेसिवीर इंजेक्शनचा रेकॉर्डच नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.
हेही वाचा:
- ऑनलाइन स्पोर्ट्स गेम म्हणजे गॅम्बलिंग नव्हे - उच्च न्यायालयाचा निर्णय
- मुंबई हायकोर्टाच्या माजी मुख्य न्यायाधीशांना लिंक पाठवून सायबर चोरट्याने घातला गंडा
- अपमानास्पद वागणुकीचा राग; घरजावायानं पत्नीसह सासरच्या पाच जणांना संपवलं; यवतमाळमध्ये रक्तरंजित थरार