मुंबई :माजी मंत्री अनिल परब यांच्यावर दापोली येथिल साई रिसाॅर्ट प्रकरणात गैरव्यवहाराचा आरोप आहे. उद्धव ठाकरे गटाचे नेते, आमदार अनिल परब यांच्या संदर्भात दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद आहे. त्याबाबत त्यांच्या बाजूने ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी सरकारी पक्षाच्या कारवाई वर सवाल उपस्थित केले आहेत. या संदर्भात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या द्विखंड पिठासमोर सुनावणीच्या वेळी सांगितले की, पर्यावरण विभागाने जी तक्रार केलेली आहे. त्यामध्ये जे आरोप केलेले आहेत तेच आरोप जी दुसरा एफआयआर परब यांच्या विरोधात नोंदवलेला आहे; त्यात एक सारखेपणा आहे.
जेव्हा एकाच घटनेच्या संदर्भात दोन दोन असे गुन्हे नोंदवले जात आहेत .तेव्हा राज्यघटनेच्या तत्वाच्या आधारे हे न्यायोचित ठरत नाही. तसेच सर्वोच्च न्यायालयाचे विविध निवाडे पाहिले असता हे न्यायाचे ठरत नाही. सबब यांना या संदर्भात संरक्षण मिळाले पाहिजे, अशी बाजू देसाई यांनी मांडली तर सरकारी पक्षाचे वकील अनिल सी सिंग यांनी नमूद केले होते की, अनिल परब यांनी जे काय बेकायदा रिसॉर्ट संदर्भातले बांधकाम केले आहे. आणि त्या संदर्भात जो गैर कारभार झालेला आहे. त्याबाबतची उचित कारवाई नियमानुसार सुरू आहे.