महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यातील दुष्काळ निवारणासाठी केंद्राकडून आणखी २ हजार १६० कोटी मंजूर - state governmen

आतापर्यंत ४ हजार २४८.५९ कोटी रूपये केंद्र सरकारकडून प्राप्त झाले आहेत. दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकारसुद्धा मोठ्या प्रमाणात पुढाकार घेत असून टँकर, चारा छावण्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा दिला जात आहे.

राज्यातील दुष्काळ निवारणासाठी केंद्राकडून आणखी २ हजार १६० कोटी मंजूर

By

Published : May 7, 2019, 10:37 PM IST

मुंबई -राज्यातील दुष्काळ निवारण्यासाठी केंद्र सरकारकडून आणखी २ हजार १६० कोटी रूपये मदतीपोटी प्राप्त झाले आहेत. राज्यात सध्या दुष्काळाची भीषण परिस्थिती आहे. त्यामुळे या मदतीने दुष्काळी भागाला थोडाफार दिलासा मिळणार आहे.

आतापर्यंत ४ हजार २४८.५९ कोटी रूपये केंद्र सरकारकडून प्राप्त झाले आहेत. दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकारसुद्धा मोठ्या प्रमाणात पुढाकार घेत असून टँकर, चारा छावण्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा दिला जात आहे. केंद्राच्या मदतीची वाट न पाहता ४ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक मदत यापूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details