महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Relationship Tips : 'या' गोष्टी टाळल्यास तुमच्या लग्नाचा मार्ग होईल मोकळा - Relationship Tips

प्रत्येक माणसाला आयुष्यात पार्टनर हवा असतो. यासाठी तो रिलेशनशिपमध्ये राहणे पसंत करतो आणि नंतर कालांतराणे लग्न करतो. काही लोकांना लग्न करायला आवडत नाही पण लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये ( relationship ) ते राहतात. ही संख्या महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये जास्त आहे. त्याशिवाय काही पुरुष स्वतःच्या इच्छेने एकटे राहणे पसंत करतात. काहीवेळा त्यांच्या आवडीच्या मुली मिळत नाहीत.

Relationship Tips
Relationship Tips

By

Published : Oct 24, 2022, 12:55 PM IST

मुंबई :प्रत्येक माणसाला आयुष्यात पार्टनर हवा असतो. यासाठी तो रिलेशनशिपमध्ये राहणे पसंत करतो आणि नंतर कालांतराणे लग्न करतो. काही लोकांना लग्न करायला आवडत नाही पण लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये ( relationship ) ते राहतात. अशा परिस्थीतीत काही जण आयुष्यभर अविवाहित राहिल्याचे दिसून आले आहे. लाखो प्रयत्न करूनही त्यांना जीवनसाथी मिळत( Not getting life partner ) नाही. ही संख्या महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये जास्त आहे. काही पुरुष स्वतःच्या इच्छेने एकटे राहणे पसंत करतात. काहीवेळा त्यांच्या आवडीच्या मुली मिळत नाहीत. तर काहींची वेगळ कारणे आहेत. शेवटी अशी कोणती कारणे आहेत जी मुलांना आयुष्यभर अविवाहित राहण्यास भाग पाडतात. ते जाणून घेणार आहोत.

स्वतःची काळजी न घेणे :असे अनेकदा निदर्शनास आले आहे की पुरुष स्वतःची काळजी घेत नाहीत. पुरुषांमधली हा प्रकार स्त्रियांना खूपत कमी आवडतो. जर पुरुष त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीत आणि दिसण्याकडे लक्ष देत नाहीत. तर स्त्रियांना अशा पुरुषांसोबत क्वचितच राहावेसे वाटते. काही वेळा पुरूषांना सोडून महिला पळून गेल्याच्याही बातम्या कानावर आल्या आहेत.

आत्मविश्वास :ज्या पुरुषांमध्ये आत्मविश्वासाची कमतरता असते. महिलाही त्याच्यापासून दूर पळतात. कारण पुरुषांनाच त्यांच्या आवडी - निवडीबाबत संदिग्धता असते. असे असेल तर महिलांना ती गोष्ट आवडत नाही. आत्मविश्वास ही अशी गोष्ट आहे जी कोणालाही आकर्षित करते. म्हणूनच महिलांना आत्मविश्वास नसलेल्या पुरुषांसोबत राहायला आवडत नाही.

प्रेम करण्यात अयशस्वी : अनेक पुरुषांना फ्लर्ट कसे करावे ( how to flirt ) हे माहित नसते. त्यामुळे ते महिलांना प्रभावित करण्यात अयशस्वी ठरतात. अशा पुरुषांना महिलांना डेट कसे करावे ( How to date women ) याबद्दल कोणतीही कल्पना नसते. त्यामुळे त्यांच्यात असा कोणता गुण आहे. जो महिलांना आवडू शकतो हे त्यांना समजत नाही. या कमतरतांमुळे पुरुष अविवाहित राहतात.

खूप निवडक असणे : काही पुरुष त्यांच्या आवडीनिवडी आणि नापसंतीबद्दल खूप निवडक असतात. पण जेव्हा हा स्वभाव लग्नाच्या बाबतीतही येतो तेव्हा त्यांना आयुष्यभर अविवाहित राहावे लागते. कारण त्यांना त्यांच्या लाइफ पार्टनरमध्ये खूप गुण हवे असतात. अशा परिस्थितीत स्त्रियांना खूप मर्यादेत राहावे ( Women live in restriction ) लागते. आणि ते त्यांना आवडत नाही. अनेक वेळा असे घडले आहे की असे पुरूश स्त्रीयांच्या प्रत्येक बाबतीत दोष शोधतात.

ABOUT THE AUTHOR

...view details