मुंबई : केवळ कॅलेंडर बदलून किंवा महिना बदलून आयुष्यात बदल होत नसतात. काहीतरी चांगलं हवं म्हणून तुम्हाला थोडा प्रयत्न करावा लागेल. आपल्या जीवनातून वाईट किंवा चुकीच्या सवयी काढून टाकूनच चांगले परिणाम मिळू शकतात. म्हणूनच नवीन वर्षात बरेच लोक संकल्प करतात, काही सवयी बदलतात आणि काही नवीन ध्येये ठेवतात. चुकीच्या जीवनशैलीत बदल करूनही नवीन वर्ष चांगले बनवता येते. आधी जाणून घ्या की कोणत्या वाईट सवयी तुमचे आयुष्य उध्वस्त करत आहेत आणि मग त्या सोडण्याचा ठाम निर्णय ( avoid five habits of life ) घ्या.
उधळपट्टी : लोकांना वाटते की जास्त खर्च करणे ही वाईट सवय नाही. जीवनाचा आनंद घेण्यासाठी खर्च करणे आवश्यक आहे. पण एखाद्या गोष्टीवर किंवा कामावर जास्त पैसे खर्च करणे तुमच्या भविष्यासाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे उधळपट्टी टाळा( Avoid extravagance ) . नवीन वर्षापासून बचत करण्याची सवय लावा, जेणेकरून तुमची बचत गरजेच्या वेळी उपयोगी पडेल.
आरोग्य :अनेकदा लोक आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यांना वाटते की ते निरोगी आहेत. अशा परिस्थितीत चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि चुकीची जीवनशैली ही सवय बनते. रात्री उशिरा झोपणे, उशिरा उठणे, वेळेवर न खाणे, आहारात चुकीचे अन्न समाविष्ट करणे, व्यायाम किंवा शारीरिक हालचाली कमी करणे इत्यादी गोष्टी आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असतात. नवीन वर्षापासून आपल्या जीवनशैलीत बदल करा आणि निरोगी जीवनशैली अंगीकारून आरोग्याकडे दुर्लक्ष करण्याची सवय सोडा.