महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Sheezan Khan Questioning : नातं संपलं तरी, एकमेकांशी चांगले संबंध होते; शीझान खानची पोलिसांना माहिती - Tunisha Sharma Death

वाळीव पोलिसांकडून शीझान खानची चौकशी करण्यात आली. नाते संपुष्टात आले असले तरी त्यांचे एकमेकांशी चांगले संबंध होते ( relationship ended but maintain good relation ) असे चौकशी दरम्यान शीझान खानने म्हटले. आत्तापर्यंत त्यांच्यातील व्हॉट्सअ‍ॅप चॅटची तपासणी करण्यात आली आहे. त्याशिवाय महत्त्वाच्या व्यक्तिची चौकशी करण्यात आली ( Sheezan Khan information during Police questioning ) आहे.

Sheezan Khan Questioning
शीझान खानची पोलिसांना माहिती

By

Published : Dec 29, 2022, 4:04 PM IST

मुंबई :तुनिषा शर्मा मृत्यूप्रकरणी तिचा सहकलाकार शीझान खानची चौकशी करण्यात ( Police Questioned Sheezan Khan )आली. अली बाबा सिरीअलच्या सेटवर तुनिषा शर्माने गळफास घेऊन आत्महत्या केली ( Tunisha Sharma Death ) होती. शीझान खानने म्हटले आहे की, तुनिषा शर्मा सोबतचे नाते संपुष्टात आले असले तरी त्यांचे एकमेकांशी चांगले संबंध होते, ते नियमितपणे बोलत असत असे चौकशी दरम्यान म्हटले.

तुनिषा शर्माच्या आईचे आरोप :तुनिषा शर्माने शनिवारी मालिकेच्या सेटवर गळफास घेत आत्महत्या केली. त्यानंतर तुनिषाच्या कुटूंबाकडून झिशान खानवर गंभीर आरोप करण्यात ( Tunisha Sharma Mother Allegation ) आले. शिझान खानने फसवूण तुनिषा शर्माचा वापर केला. घटनेच्या दिवशी, शिझान खान आणि तुनिषा शर्मा शूटिंगच्या लंच ब्रेकमध्ये भेटले. त्यांच्यात १५ मिनिटे चर्चा झाली. बोलल्यानंतर शिझान खान त्याच्या शूटसाठी निघून गेला. आणि नंतर तुनिषा शर्माने गळफास घेतला. असा तिच्या आईकडून आरोप करण्यात आला आहे. तुनिषा शर्माला आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल शिझान खान सध्या पोलीस कोठडीत आहे.

शीझान खानची चौकशी :तुनिषा शर्मासोबत सेटवर चर्चा करताना नेमके काय झाले याबद्दल शीझान खानला विचारले जात आहे. आतापर्यंत शीझान खान याच्याकडून त्यांच्यात काय घडले हे उघड झाले नाही. पोलिसांनी आतापर्यंत तुनिषा शर्माची आई, काका, इतर नातेवाईक, सेटवरील क्रू आणि सहकलाकारांसह अनेक लोकांचे जबाब नोंदवले आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले. पोलिसांनी गुरुवारी शीझान खानच्या बहिणीला चौकशीसाठी बोलावले, परंतु ती अद्याप तपास अधिकाऱ्यासमोर हजर झाली नाही, असे त्यांनी सांगितले. पोलीस शीझान खानच्या संपर्कात असलेल्या आणखी एका महिलेची चौकशी करत होते, असे अधिकाऱ्याने सांगितले. शीझान खान आणि तुनिषा शर्मा यांच्यात झालेल्या व्हॉट्सअ‍ॅप चॅट्सचीही तपासणी करत ( Tunisha Sharma Sheezan Khan WhatsApp chat ) आहेत. तुनिषा शर्माने 'भारत का वीर पुत्र महाराणा' या टीव्ही शोमध्येही काम केले आहे. 'फितूर' आणि 'बार बार देखो' सारख्या चित्रपटांमध्येही काम केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details