मुंबई - कोरोना आणि लॉकडाऊनमुळे महाराष्ट्राचा महसूल बुडत असून तिजोरी रिकामी राहत आहे. अशात महाराष्ट्राला ज्या मालमत्ता नोंदणी आणि मुद्रांक शुल्कातून सर्वाधिक महसूल मिळतो त्यात एप्रिलमध्ये 0.001 टक्क्यांनी घट झाली आहे. मार्चमध्ये जिथे 377 कोटी 13 लाख 56 हजार 375 रुपये महसुल जमा झाला होता. तिथे एप्रिलमध्ये केवळ 43 हजार 547 रुपये इतकाच महसूल जमा झाला आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने ही चिंतेची बाब आहे.
चिंताजनक! नोंदणी-मुद्रांक शुल्क महसुलात 0.001 टक्क्यांची घट, एप्रिलमध्ये फक्त 43 हजार 547 रुपये जमा - Revenue of Maharashtra declined by 0.001 percent
मालमत्ता नोंदणी आणि मुद्रांक शुल्क भरणा महाराष्ट्रात सर्वाधिक होतो. कारण मुंबईसह एमएमआरमध्ये सर्वाधिक घरखरेदी-विक्री आणि अन्य मालमत्तासंबंधीचे व्यवहार होतात. त्यामुळे यातून कोट्यवधी रुपये राज्याच्या तिजोरीत जमा होतात. पण मागील दोन महिन्यात यात मोठी घट झाली आहे. कोरोनाचे संकट आणि लॉकडाऊनमुळे घरखरेदी-विक्री ठप्प असून पर्यायाने नोंदणी-मुद्रांक शुल्क भरणाही बंद आहे. त्यामुळे यातून मिळणाऱ्या महसुलात कमालीची घट झाली आहे.

फेब्रुवारीमध्ये राज्यात 470 कोटी रुपये इतका महसुल जमा झाला होता. मात्र, मार्च मध्यापासून महाराष्ट्रात संचारबंदी त्यानंतर लॉकडाऊन लागू झाले. यामुळे, बांधकाम आणि साईट व्हिजिट बंद झाल्याने घरनोंदणी इतर व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळेच फेब्रुवारीमधील महसूल 470 कोटींहून मार्चमध्ये 377 कोटींवर आला आहे. तर, एप्रिलमध्ये यात धक्कादायक घट झाली आहे. तीही ऑनलाइन नोंदणी सुरू असताना एप्रिलमध्ये केवळ आणि 43 हजार 547 रुपये इतकाच महसूल मिळाला आहे. अगदी 50 हजारांचाही आकडा गाठू न शकल्याने ही अत्यंत चिंतेची बाब मानली जात आहे. जिथे फेब्रुवारी महिन्यात 25 हजार 170 दस्तांची नोंदणी झाली होती. तिथे एप्रिलमध्ये केवळ 27 दस्तांची नोंदणी झाली असून यात लिव्ह अँड लायसन्सचाच समावेश आहे.