मुंबई- मुंबई विद्यापीठ आणि सलंग्नित महाविद्यालयात पदवीच्या प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेसंबंधी मार्गदर्शन करण्यासाठी कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यापीठाच्या नावनोंदणी, पात्रता व स्थलांतर प्रमाणपत्र विभागामार्फत जिल्हा आणि क्षेत्रीय स्तरांवर हे आयोजन करण्यात आले होते. 30 एप्रिल ते 23 मे 2019 दरम्यान विद्यापीठाच्या विविध महाविद्यालयांत या कार्यशाळा पार पडल्या.
मुंबई विद्यापीठामार्फSeत गेल्या अनेक वर्षांपासून पदवीच्या प्रथम वर्षाची प्रवेशपूर्व नावनोंदणीची प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने राबवली जाते. या प्रक्रियेत प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांची पात्रता, स्थलांतर आणि अनुषांगिक इतर प्रशासकीय बाबींसंदर्भात महाविद्यालयांना योग्य ते मार्गदर्शन मिळावे यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेला पात्रता व स्थलांतर प्रमाणपत्र विभागातील उपकुलसचिव आणि कर्मचारी वर्गासंह एमकेसीएलच्या अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.