मुंबई - मुलुंड विधानसभा क्षेत्रातील मुलुंड वाणिज्य महाविद्यालयासमोर आज युवासेना मुलुंड तर्फे सदस्य नोंदणी अभियान राबवण्यात आले. युवासेना लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर युवकांना मोठ्या प्रमाणात आकर्षित करून घेत सदस्य संख्या वाढवत आहे. २ रुपये नोंदणी शुल्क व मोबाईल क्रमांक घेऊन नोंदणी करण्यात येत आहे. नोंदणीकृत सदस्यांना व्हाट्सअॅपच्या माध्यमातून एकत्र करण्यात येणार आहे.
परीक्षाकाळात युवासेनेचे महाविद्यालयासमोर नोंदणी अभियान - युवासेना सदस्य नोंदणी अभियान
२ रुपये नोंदणी शुल्क व मोबाईल क्रमांक घेऊन नोंदणी करण्यात येत आहे. नोंदणीकृत सदस्यांना व्हाट्सअॅपच्या माध्यमातून एकत्र करण्यात येणार आहे.
मुलुंड विधानसभा क्षेत्रात युवासेना मुलुंडतर्फे महाविद्यालयातील १६ ते ३० वयोगटातील युवक युवतींची सदस्य नोंदणी अभियान जोरात चालू आहे. केळकर महाविद्यालय, वाणी, व्हीपीएम, मुलुंड वाणिज्य, जय भारत, मुलुंड विद्यामंदिर, फ्रेंड्स, पुरंदरे रात्र महाविद्यालय, रतनबाई रात्र महाविद्यालय आदी महाविद्यालयात युवासेना विधानसभा क्षेत्र मुलुंडतर्फे सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. १२ वीच्या परीक्षा चालू असतानाही युवक, युवतींना २४ तास मुंबई चालू राहिली पाहिजे यांसारख्या विषयावर मार्गदर्शन तसेच समस्या सोडवण्याचे आश्वासन देऊन त्यांच्याकडून नोंदणी करून घेतली जात आहे. याबाबत मुलुंडचे शाखा अधिकारी वेदांत साळगावकर माहिती देत आहेत. आज सदस्य नोंदणी अभियानात मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातील सकाळच्या सत्रात २०० युवक युवतींनी नोंदणी केली आहे.