महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबई काँग्रेसच्या निवडणूक छाननी समितीत आजी-माजी अध्यक्षांची उलट तपासणी - अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी

काँग्रेसच्या छाननी समितीचे अध्यक्ष ज्योतिरादित्य शिंदे व प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे मुंबईतील प्रत्येक नेत्यांना वेगवेगळे बोलावून त्यांची चौकशी केली असल्याचे समोर येत आहे.

मुंबई प्रदेश काँग्रेस

By

Published : Sep 10, 2019, 11:46 PM IST

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत काँग्रेस पक्षाची मोठ्या प्रमाणात पडझड होत आहे. त्यातच दोन गटात विभागलेली काँग्रेसही पहायला मिळत आहे. यामागे कोणकोणती कारणे आहेत याचा शोध घेण्यासाठी मंगळवारी काँग्रेसच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूक छाननी समितीने मुंबई प्रदेशच्या आजी-माजी प्रदेशाध्यक्षांची कसून चौकशी करत त्यांची उलटतपासणी घेण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे.

हेही वाचा - काँग्रेसला दिवसभरात तिसरा धक्का.... कृपाशंकर सिंहांनीही सोडली 'हाताची' साथ

मुंबई प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांची आज दिल्लीत कॉंग्रेसच्या निवडणूक छाननी समितीसमोर उलट तपासणी घेण्यात आली. त्यावेळी समितीने मुंबईतील काँग्रेसचे संभाव्य उमेदवार आणि त्यांच्या यादीवर चर्चा केली असल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा - पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून उर्मिला मातोंडकरचा काँग्रेसला 'गुडबाय'

विधानसभा निवडणुकीचे बिगूल कोणत्याही क्षणी वाजण्याची शक्यता असताना मुंबई काँग्रेसमध्ये मात्र गटबाजीने मोठी दुफळी माजली आहे. यातच आज लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान काँग्रेसमध्ये आलेल्या प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याने व त्यापाठोपाठ काँग्रेसचे माजी मंत्री कृपाशंकर सिंह हेही भाजपमध्ये जाणार असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे काँग्रेसच्या छाननी समितीचे अध्यक्ष ज्योतिरादित्य शिंदे आणि प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी मुंबईतील प्रत्येक नेत्यांना वेगवेगळे बोलावून त्यांची चौकशी केली. त्यानंतर त्यांच्याकडून इच्छुक असलेल्या उमेदवारांची नावांची यादी समितीने घेतली असल्याचे सांगण्यात येते. यात काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष एकनाथ गायकवाड, माजी प्रदेशाध्यक्ष संजय निरुपम आणि माजी अध्यक्ष मिलिंद देवरा यांच्यासह काँग्रेसचे विधानभवनातील उपनेते नसीम खान यांचीही चौकशी करून विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान काँग्रेसला आणखी काय करता येईल याची माहिती समितीने घेतली असल्याचे सूत्राकडून सांगण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details