Malegaon Blast Case : मालेगाव ब्लास्ट प्रकरणातील दोन आरोपींविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी - साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर
मालेगाव ब्लास्ट प्रकरणातील (Malegaon blast case) दोन फरार आरोपींविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी (Red Corner Notice issued) करण्यात आली. रामजी कालसंगरा, संदीप डांगे यांच्या नावाने एनआयए कोर्टाने (NIA Court) ही रेड कॉर्नर नोटीस जारी केली. या प्रकरणाचा सध्या तपास करत असलेल्या एनआयएच्या विनंतीवरून कोर्टानं ही कारवाई केली आहे.
मुंबई: 29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावमधील एका मशिदीत बॉम्बस्फोट झाला होता. यात 7 जणांना आपला प्राण गमवावा लागला. याप्रकरणी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, (Lt Col Prasad Purohit) साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर (Sadhvi Pragya Singh Thakur) यांच्यासह रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, सुधाकर चतुर्वेदी, सुधाकर द्विवेदी, अजय राहिरकर यांना अटक करून त्यांच्यावर मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयात खटल्याची सुनावणी सुरू आहे. यातील दोन संशयित आरोपी अद्याप फरार असून सर्व आरोपी जामीनवर बाहेर आहेत. माध्यमांनी या खटल्यासंदर्भात कोणत्याही प्रकारचे वादविवाद, मुलाखत, चर्चा करू नयेत, साक्षीदारांची नावे, पत्ता उघड करू नये, इत्यादी बंधने घालत प्रवेश दिला होता. सध्या याचे काही माध्यमे उल्लंघन करत असल्याचा आरोप करत पुरोहित यांनी हा खटला इन कॅमेरा चालवण्यासाठी कोर्टात अर्ज केला आहे.