मुंबई - मागील ३ वर्षात अंगणवाडीत रिक्त झालेल्या ६ हजार ५०० पदांची भरती लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली. अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांच्या पदभरतीवर घातलेले निर्बंध उठवण्यात आले असल्याचेही त्या म्हणाल्या.
राज्यात लवकरच अंगणवाडी सेविकांच्या ६ हजार ५०० पदांची भरती - यशोमती ठाकूर
मागील ३ वर्षात अंगणवाडीत रिक्त झालेल्या ६ हजार ५०० पदांची भरती लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली.
महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर
महाविकास आघाडीच्या मंत्रीमंडळात महिला व बालविकास विभागाच्या मंत्रीपदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर ठाकूर यांनी अंगणवाडी सेविकांचा विषय हाती घेतला आहे. गावोगावी पुरेशा अंगणवाड्या सुरु व्हाव्यात, मुलांना शिक्षणाची गोडी लागावी या हेतून नव्या अंगणवाड्या सुरु करण्यात येणार असल्याचेही त्या म्हणाल्या.
Conclusion: